कलाकार मंडळी आपल्या लाडक्या जोडीदारासह लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. अनेकांचे जोडीदार हे स्वतःही याच क्षेत्रातले आहेत. एकत्र काम करणा-या पती-पत्नी कलाकारांच्या कितीतरी जोड्या आहेत. अशीच एक दिलीप कुमार यांची नातं सायेशा सहगल आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा लोकप्रिय अभिनेता आर्या.  सायशा सहगल अजय देवगणच्या “शिवाय” या चित्रपटातून ती अभिनेत्री म्हणून नावारूपास आली. हिंदी चित्रपटांपेक्षा ती टॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये अभिनेत्री म्हणून जास्त नाव कमवले आहे. बॉलिवूडमध्ये तिचे करिअर फ्लॉप ठरले. त्यानंतर लग्नबंधनात अडकत ती तिच्या संसारिक आयुष्यात रमली. 

विशेष म्हणजे वयाच्या २२ व्या वर्षी  सायशाने ३९ वर्षाच्या अभिनेता आर्या याच्यासोबत तिने लग्न केले. 10 मार्च 2019 मध्ये आर्यासोबत ती विवाहबंधनात अडकत आपल्या आय़ुष्याची नवीन सुरूवात केली होती. त्या दोघांमध्ये जवळजवळ १७ वर्षांचा फरक आहे. ‘गजनीकांत’ या साऊथ चित्रपटात आर्या आणि सायशा यांनी एकत्र काम केले. 

याच चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आर्या  हा प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनयासोबतच तो एक उत्तम उद्योगपती आहे. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.

चेन्नईतील 'शी सेल' हॉटेलचा  तो मालक आहे. यासोबतच त्याची 'द शी पीपल' नावाने प्रोडक्शन कंपनी आहे. या कंपनीनुसार तो न्यू टॅलेंटला पुढे जाण्याची संधी देतो.  आर्याने  'कलभा कधलन' , 'माय कन्नाडी' , 'सर्वम' , 'राजा रानी' , 'जीवा'  सोबतच अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Arya and Sayyeshaa wedding: when trolls pounce on their age gap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.