ठळक मुद्देआरिकचा चेहरा लोकांना व्यवस्थितपणे दिसू नये यासाठी एका फोटोत त्याच्या चेहऱ्यावर तिने हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे तर दुसऱ्या फोटोत अर्जुन समुद्रकिनारी दिसत असून त्याच्या हातात गोंडस आरिक आपल्याला दिसून येत आहे. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची गर्लफ्रेन्ड गॅब्रिएला डेमिट्रिएड्स सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असतात. 18 जुलैला गॅब्रिएलाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आणि अर्जुन तिसऱ्यांदा बाबा झाला. बाळाच्या जन्मानंतर उण्यापुऱ्या दहाच दिवसांत गॅब्रिएला तिच्या जुन्या शेपमध्ये परतली होती. वर्कआऊटनंतरचा एक फोटो तिनेच सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ती एकदम फिट दिसली होती. हा फोटो पाहिल्यानंतर तिने खरंच काही दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिला आहे, यावर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. गॅब्रिएला सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. आता तिने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्यांच्या मुलाचा फोटो पोस्ट केला आहे.

गॅब्रिएलाने सोशल मीडियावर अर्जुन आणि तिच्या बाळासोबतचे व्हेकेशनचे फोटो पोस्ट केले असून या फोटोत त्यांचा मुलगा आरिकची झलक आपल्याला पाहायला मिळत आहे. आरिकचा चेहरा लोकांना व्यवस्थितपणे दिसू नये यासाठी एका फोटोत त्याच्या चेहऱ्यावर तिने हार्टचा इमोजी पोस्ट केला आहे तर दुसऱ्या फोटोत अर्जुन समुद्रकिनारी दिसत असून त्याच्या हातात गोंडस आरिक आपल्याला दिसून येत आहे. 

गॅब्रिएला 2009 मध्ये आयपीएल दरम्यान पहिल्यांदा पाहाण्यात आले होते. त्यानंतर अचानक अर्जुन रामपालसोबत तिच्या अफेअर बातम्या चर्चेत आल्या. यानंतर दोघेही लग्न करणार, असे मानले जात असतानाच ग्रॅब्रिएलाने अर्जुनच्या मुलाला जन्म दिला. म्हणजे लग्नाआधीच ग्रॅब्रिएला आई झाली.

गॅब्रिएला आणि अर्जुन 2018 पासून एकमेकांना डेट करत आहेत. गॅब्रिएला सध्या भारतातच वास्तव्यास असून हे दोघंही लवकरच लग्न करतील असे बोलले जात आहे. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या काही आठवड्यात गॅब्रिएलाने वजन घटवले असून ती आता पूवीर्पेक्षा अधिक हॉट दिसत असल्याचे तिच्या चाहत्यांचे मत आहे. गॅब्रिएलाला 2017 मध्ये FHM मासिकाकडून जगातल्या पहिल्या 100 सेक्सी महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आले होते.

इन्स्टाग्रामवर तिचे 361000 फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

Web Title: Arjun Rampal And Gabriella Demetriades' Son, Arik Rampal Enjoys His First Beach Vacation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.