मलायकासाठी वाट्टेल ते...! अर्जुन कपूरनं फक्त प्रेमासाठी मोजले 23 कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 10:37 AM2021-07-28T10:37:07+5:302021-07-28T10:39:23+5:30

अर्जुन कपूर चित्रपटांपेक्षा कमी आणि मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतो. अर्जुन व मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत, हे आताश: नव्यानं सांगण्याची गरज नाही...

arjun kapoor spent 23 crore for her girlfriend malaika arora | मलायकासाठी वाट्टेल ते...! अर्जुन कपूरनं फक्त प्रेमासाठी मोजले 23 कोटी रूपये

मलायकासाठी वाट्टेल ते...! अर्जुन कपूरनं फक्त प्रेमासाठी मोजले 23 कोटी रूपये

Next
ठळक मुद्देमलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचं नातं आता त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारलं आहे.

अर्जुन कपूर (Arjun Kapoor ) चित्रपटांपेक्षा कमी आणि मलायका अरोरासोबतच्या (Malaika Arora) रिलेशनशिपमुळे अधिक चर्चेत असतो. अर्जुन व मलायका रिलेशनशिपमध्ये आहेत, हे आताश: नव्यानं सांगण्याची गरज नाही. जगाची पर्वा न करता हे कपल बिनधास्त एकत्र फिरताना दिसतात. आता  तर अर्जुनला मलायकाचा विरह जराही सहन होत नाही. म्हणूनच आता मलायकाच्या घराजवळच त्यानं एक सी-फेसिंग व्हिला खरेदी केला आहे. या 4 बीएचके व्हिलाची किंमत 20 ते 23 कोटी रूपये असल्याचं कळतंय. त्याचा हा व्हिला 26 व्या मजल्यावर आहे. प्रेमात काहीही असं म्हणतात ते उगाच नाही. अद्याप मलायका व अर्जुन वेगवेगळे राहतात. पण दोघंही आता एकमेकांच्या जवळ राहायला आले आहेत. आता हे कपल लग्न करून एकत्र केव्हा नांदते, हा प्रश्न मात्र अद्याप तरी अनुत्तरीत आहे.

रिपोर्टनुसार, मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अर्जुनची नेटवर्थ 10 मिलियन डॉलर आहे. भारतीय रूपयांत हा आकडा 74 कोटी रूपये आहे. म्हणजेच एक महिन्याला अर्जुन 1 कोटींपेक्षा अधिक कमावतो. वर्षाकाठी त्याची कमाई 8 ते 10 कोटीच्या घरात आहे. अर्जुन एका सिनेमासाठी 5 ते 7 कोटी रूपये घेतो आणि जाहिरातीसाठी सुमारे 1 कोटी रूपये आकारतो.

मलायकाची संपत्ती जोडली तर या कपलकडे 188 कोटींची संपत्ती आहे. एकटी मलायका 100 कोटींची मालकीण आहे आणि अर्जुनकडे 88 कोटींची संपत्ती असावी असा अंदाज आहे.
मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांचं नातं आता त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारलं आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकानं अर्जुन कपूरसोबतचं नातं आॅफिशिअल केलं होतं. 
 

Web Title: arjun kapoor spent 23 crore for her girlfriend malaika arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app