ठळक मुद्दे मलायका ही 46 वर्षांची आहे तर अर्जुन तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे.

मलायका अरोराने काल 23 ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केला. साहजिकच बॉलिवूडच्या सेलिब्रेटींनी आणि चाहत्यांनी मलायकावर शुभेच्छांचा वर्षाव केला. त्याआधी मलायकाच्या वाढदिवसाची जंगी पार्टीही रंगली. एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रंगलेल्या या पार्टीला करिना कपूर, करण जोहर, करिश्मा कपूर अशा अनेकांनी हजेरी लावली. मलायकाचा बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूर हाही यावेळी हजर होता. पार्टीतील त्याचा वावर खास होता. पण त्याहीपेक्षा खास होत्या त्या अर्जुनने मलायकाला दिलेल्या शुभेच्छा. अर्जुनने इन्स्टाग्रामवर असा काही फोटो शेअर केला की, एकूणच सगळे काही स्पष्ट झाले. होय, या फोटोत अर्जुन मलायकाला किस करताना दिसला. एकंदर काय तर अर्जुनने मलायकासोबतचे नाते जगजाहिर केले.


सध्या या फोटोवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या कमेंट पाहायला मिळत आहेत. ‘क्या ये हमारी भाभी है भैय्या?’ असा प्रश्न हा फोटो पाहिल्यानंतर एका युजरने विचारला. अन्य एका युजरने ‘रब ने बना दी जोडी’ अशी प्रतिक्रिया दिली. तर दुस-या एका युजरने ‘अखेर नाते सर्वांसमोर आलेच’ असे लिहिले. 


यापूर्वी जूनमध्ये मलायका व अर्जुन न्यूयॉर्कमध्ये हॉलिडेसाठी गेले होते. तेव्हाही दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून पोज दिली होती. तेव्हाच या नात्यावर शिक्कामोर्तब झाले होते.  ताज्या फोटोनंतर तर सगळे काही अगदी स्पष्ट झाले आहे.


मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहे. मलायकाने अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा जोरात सुरु झाली. मलायका ही 46 वर्षांची आहे तर अर्जुन तिच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. वयाच्या या फरकावरून अनेकदा अर्जुन व मलायका ट्रोल झालेत. पण दोघांनीही याची पर्वा केली नाही. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे.


Web Title: arjun kapoor shares a photo with malaika arora on her birthday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.