ठळक मुद्देकरण मलायकाला बोलताना दिसत आहे की, २० तास प्रवास करून देखील तू खूपच सुंदर दिसत आहेस. यावर अर्जुन क्षणाचाही विलंब न करताना त्याला म्हणत आहे की, अरे वो पिछे वाली है ना... उसके साथ फ्लर्ट कर ना...

इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी एकत्र हजेरी लावली आहे. या फेस्टिव्हलमध्ये नुकतीच एक मजेशीर गोष्ट घडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नचा सूत्रसंचालक करण ठक्कर मलायका अरोराची प्रशंसा करताना दिसत आहे. पण तिची ही प्रशंसा तिचा पझेसिव्ह बॉयफ्रेंड अर्जुनला रुचली नसल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याने करणला एक मजेशीर उत्तर देत त्याची बोलतीच बंद केली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये अर्जुन आणि मलायका बाजूला बसले असल्याचे दिसत असून करण मलायकाची चांगलीच तारीफ करत आहे. तो या व्हिडिओत आपल्याला बोलताना दिसत आहे की, २० तास प्रवास करून देखील तू खूपच सुंदर दिसत आहेस आणि एवढेच नव्हे तर मलायकाच्या बाजूला बसायला मिळाल्यामुळे तू खूपच भाग्यवान आहे असे देखील तो अर्जुनला म्हणताना दिसत आहे. यावर अर्जुन क्षणाचाही विलंब न करताना त्याला म्हणत आहे की, अरे वो पिछे वाली है ना... उसके साथ फ्लर्ट कर ना... अर्जुनचे हे उत्तर ऐकून केवळ करणलाच नव्हे तर उपस्थितांना देखील त्यांचे हसू आवरत नसल्याचे आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. 

अर्जुन आणि मलायकाने सुरुवातीला त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. मात्र अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर ते दोघे न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तिथले फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले. हे फोटो खूप व्हायरल झाले होते. 

मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून मीडियात येत होत्या. एवढेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी अर्जुनने मलायकाच्या वडिलांची आणि बहिणीची भेट घेतल्यामुळे या चर्चांना ऊत आले होते. पण अद्याप तरी आम्ही लग्नाचा विचार केला नसल्याचे मलायकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. 
 

Web Title: Arjun Kapoor saves girlfriend Malaika Arora from flirty Karan Tacker at IFFM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.