ठळक मुद्देअलीकडे नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायका अरोराने लग्नाबद्दल सांगितले होते.

अर्जुन कपूर सध्या चित्रपटांत बिझी आहे. अर्जुनचा ‘पानिपत’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. सध्या अर्जुन या चित्रपटाचे प्रमोशन करतोय. याशिवाय आपल्या लव्हलाईफमध्येही तो बिझी आहे. मलायका अरोरा आणि अर्जुनच्या प्रेमाचे किस्से सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत. हे कपल लवकरच लग्न करणार असेही मानले जात आहे. पण लग्नाच्या मुद्यावर अर्जुनने सध्या तरी एक वेगळाच खुलासा केला आहे.
होय, ताज्या मुलाखतीत अर्जुनला त्याच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले. यावर सध्या मी हॅपी स्पेसमध्ये आहे. मात्र लग्न करण्याचे माझे कुठलेही मूड नाही, असे तो म्हणाला. अर्जुनच्या मते, मलायकाही यावेळी लग्नाच्या मूडमध्ये नाही. 

‘आम्ही जेव्हाकेव्हा लग्न करू, तेव्हा सगळ्यांना अगदी आनंदाने सांगू. सगळ्यांना निमंत्रण देऊ. आमच्या कुटुंबात थाटामाटात लग्न होतात. काही निवडक लोकांच्या उपस्थितीत लग्न व्हावे, ही कुटुंबाची इच्छा नाही. त्यामुळे मला घाईघाईत लग्न करायचे नाही,’ असेही अर्जुनने सांगितले.

अलीकडे मलायका अरोराने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये लग्नाबद्दल सांगितले होते. माझे लग्न बीचवर व्हावे. माझ्या लग्नात सगळे काही व्हाईट असावे. लग्नात मी एली साब गाऊन घालणार. माझी गर्लगँग माझ्या ब्राइड्मेट्स बनतील, असे ती म्हणाली होती.

यावरून अर्जुन व मलायका लवकरच लग्न करणार असे मानले गेले होते. पण आता अर्जुनने वेगळेच कारण सांगितले आहे. एकंदर काय तर सध्या मलायका व अर्जुनचे लग्नाचे मूड नाही. पण हे लग्न होणार इतकेच मात्र नक्की आहे.


Web Title: arjun kapoor said malaika dont want to marry right now
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.