Arjun Kapoor launches 'Madi' teaser on social media | अर्जुन कपूरने सोशल मीडियावर केला 'मडी'चा टीझर लाँच

अर्जुन कपूरने सोशल मीडियावर केला 'मडी'चा टीझर लाँच

मड रेसिंगला अधोरेखित करणारा मडी हा पैन-इंडिया चित्रपट, आधी कधीही पाहिला नाही असा, आकर्षक आणि भव्य अशा संहितेने  परिपूर्ण असणार आहे. या विषयाला या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच रेखाटण्यात येणार आहे. डॉ. प्रगाबल या सिनेमासोबत एक नवी लाट निर्माण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर मडीचा टीझर लाँच केला आहे. 

नुकत्याच मोशन पोस्टरच्या प्रदर्शानानंतर, आता अर्जुन कपूरद्वारे 'मडी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, ज्याने सगळ्यांनाच उत्साहित केले आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर विजय सेतुपति यांनी सादर केले होते, ज्याने सगळ्यांनाच खूप प्रभावित केले होते.  

पहिल्यांदाच निर्देशकाच्या खुर्चीवर बसलेल्या डॉ प्रगाबल यांच्या द्वारे निर्देशित हा चित्रपट पीके 7 क्रिएशन्स बैनर खाली बनत असून प्रेमा कृष्णदास द्वारा निर्मित आहे. चित्रपट प्रत्येक बाबतीत अनोखा असून यशस्वीतेची हमखास खात्री आहे. या साहसी एक्शन थ्रिलरचा जन्म चित्रपट निर्माताच्या ऑफ-रोड रेसिंग आणि त्या प्रति असलेल्या घनिष्ट प्रेमातून झाला आहे.  

सर्व काही रियलिस्टिक, कोणत्याही रेफरेंसशिवाय आणि गहन रिसर्चसोबत, चित्रपटाचा टीज़र एक मास्टरपीस बनला आहे. चित्रपटात युवान, रिधान कृष्णा, अनुषा सुरेश आणि अमित शिवदास नायर प्रमुख कलाकार असून हरीश पेराडी, आई एम विजयन आणि रेणजी पणिक्कर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Arjun Kapoor launches 'Madi' teaser on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.