श्रीदेवी यांच्या अंत्यसंस्कारात असंख्य सेलिब्रिटींसह हजारोंच्या संख्येने त्यांचे चाहते उपस्थित झाले आहेत. श्रीदेवी यांना मुंबई पोलिसांनी गार्ड आॅफ आॅनर दिला. तीन राउंड फायरिंग करून त्यांना सलामी दिली. पांढºया रंगाच्या फुलांनी सजविलेल्या वैकुंठ रथात श्रीदेवी यांचे पार्थिव स्मशानभूमीच्या दिशेने नेले जात आहे. यावेळी बोनी कपूर, श्रीदेवी यांचा सावत्र मुलगा अर्जुन कपूर, दीर अनिल आणि संजय कपूर, पुतण्या मोहित मारवाह, अक्षय मारवाह उपस्थित आहेत. श्रीदेवी यांच्या निधनामुळे पती बोनी कपूर पूर्णत: हतबल झाल्याचे दिसून येत असताना मुलगा अर्जुन कपूर त्यांना आधार देताना दिसून येत आहे. 

 

Web Title: Arjun Kapoor became the father of sad eyes; See photos of Sridevi's last journey!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.