arjun kapoor and girlfriend malaika arora tests covid positive | अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; गर्लफ्रेन्ड मलायका अरोराही पॉझिटीव्ह?

अर्जुन कपूरला कोरोनाची लागण; गर्लफ्रेन्ड मलायका अरोराही पॉझिटीव्ह?

ठळक मुद्देमलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

कोरोनाचा कहर वाढत असताना आता एकापाठोपाठ एक सेलिब्रिटीही कोरोना पॉझिटीव्ह आढळत आहेत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याला कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर अर्जुनने स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे.
अर्जुनने स्वत: सोशल मीडियावर ही माहिती दिली.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. मात्र माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टर आणि प्रशासनाच्या सूचनेनुसार मी स्वत:ला आयसोलेट केले असून होम क्वारंटाईनमध्ये आहे. मी यातून लवकर बरा होईल, असा मला विश्वास आहे, असे अर्जुन कपूरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

अर्जून कपूर सध्या रकुलप्रीत सिंग आणि नीना गुप्ता यांच्यासोबत एका सिनेमाच्या शूटींगमध्ये बिझी होता. फिल्मसिटीत या सिनेमाचे शूटींग सुरु होते. सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. तथापि अर्जुन कपूर कोरोना संक्रमित आढळल्यानंतर शूटींग थांबवण्यात आले आहे.

मलायका अरोराही कोरोना पॉझिटीव्ह?

अर्जुन कपूरच नाही तर त्याची गर्लफ्रेन्ड  मलायका अरोरा कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याचे कळतेय.
‘PeepingMoon’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मलायका अरोरा सध्या ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’ हा रिअ‍ॅलिटी शो जज करतेय. अलीकडे या शोच्या सेटवर कोरोना रूग्ण आढळले होते. ‘इंडियाज् बेस्ट डान्सर’च्या सेटवर 7 ते 8 जणांना कोरोना झाल्याचे वृत्त होते. आता मलायका अरोरा हिचा रिपोर्टही पॉझिटीव्ह असल्याचे कळतेय. सध्या मलायका होम क्वारंटाइनमध्ये आहे. अर्थात अद्याप मलायकाने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मलायका व अर्जुन दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. हे कपल लवकरच लग्न करणार असल्याचे मानले जात आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: arjun kapoor and girlfriend malaika arora tests covid positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.