Arjun Kapoor and Anshulo have forgotten the past and forgotten, Hushal | ​भूतकाळ विसरून अर्जुन कपूर आणि अंशुलाने दिला जान्हवी, खुशीला आधार

​भूतकाळ विसरून अर्जुन कपूर आणि अंशुलाने दिला जान्हवी, खुशीला आधार

बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना कपूर यांची मुले अंशुला आणि अर्जुन गेल्या दोन दिवसांपासून जान्हवी आणि खुशीला आधार देत आहेत. श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी समजताच अर्जुन कपूर नमस्ते लंडन या चित्रपटाचे चित्रीकरण सोडून मुंबईला रवाना झाला. तो जान्हवी आणि खुशी यांना भेटायला अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो त्याच्या वडिलांना आधार द्यायला दुबईला रवाना झाला. तसेच तो मुंबई विमानतळावरून देखील कपूर कुटुंबियांसोबत अंधेरीच्या बोनी कपूर यांच्या घरी गेला होता. तो रात्री देखील तिथेच थांबला होता. आपल्या आईचे पार्थिव पाहून जान्हवी आणि खुशी या दोघींची अवस्था अतिशय वाईट झाली होती. आईचे पार्थिव पाहून दोघी जोरजोरात रडत होत्या. तसेच अम्मा, अम्मा अशा हाका मारत होत्या. त्यांची ही अवस्था पाहून उपस्थित सगळ्यांना रडू कोसळले होते. दोघांना सांभाळणे कठीण झाले होते. त्या दोघांची ही अवस्था अर्जुनला देखील पाहावत नव्हती. अर्जुनची बहीण अंशुला देखील रविवारी जान्हवी आणि खुशीला भेटायला अनिल कपूर यांच्या घरी गेली होती. काल रात्री देखील आपल्या वडिलांना आधार द्यायला अंशुला बोनी कपूर यांच्या घरी पोहोचली होती. 
श्रीदेवी यांच्या पार्थिवावर आज दुपारी साडेतीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लबमध्ये श्रीदेवी यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले गेले आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता सेलिब्रेशन क्लबमधून श्रीदेवी यांची अंत्ययात्रा निघेल. आपल्या लाडक्या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो चाहते जमले आहेत. 
श्रीदेवी यांचे ५४ व्या वर्षी निधन झाले. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला होता. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. 

Also Read : ​श्रीदेवी यांचे पार्थिव पाहिल्यानंतर जान्हवी आणि खुशीची झाली अशी अवस्था

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Arjun Kapoor and Anshulo have forgotten the past and forgotten, Hushal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.