क्या बात है... 'शोले'तील सांभाच्या मुलीचं 'लय भारी' काम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 06:01 PM2021-05-10T18:01:23+5:302021-05-10T18:22:02+5:30

मॅक यांनी ४६ वर्षांच्या त्या करिअरमध्ये जवळपसा १७५ सिनेमात काम केले आहे. त्याच्या काळातील सर्व बड्या चित्रपट दिग्दर्शकांनी काम दिलं होतं.

Are o Sambaa!!! 'Sholay' fame Samba's real life daughter are also getting fame in bollywood,know How | क्या बात है... 'शोले'तील सांभाच्या मुलीचं 'लय भारी' काम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

क्या बात है... 'शोले'तील सांभाच्या मुलीचं 'लय भारी' काम, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Next

1975 साली आलेल्या 'शोले' सिनेमानं बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला. सिनेमातल्या प्रत्येक कलाकाची भूमिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली. सिनेमातल्या जय- वीरु आणि बसंती इतकेच इतर भूमिकांनीही रसिकांनी डोक्यावर घेतले.'शोले' सिनेमात सांभाची भूमिका साकारणारा अभिनेता मॅक मोहन यांनाही त्यावेळी प्रचंड लोकप्रियता मिळाली.

 

मॅक यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मॅकच्या मुलींनी  देखील इंडस्ट्रीत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. विनती मकिजानी आणि मंजरी मकिजानी असे या दोन्ही मुलींची नावं आहेत. विक्रम मकिजानी असे मुलाचे नाव आहे. विनती आणि मंजरी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. 


मंजरी प्रोड्युसर म्हणून काम करते. शॉर्ट फिल्म्ससाठी ती ओळखली जाते. 2012 मध्ये 'द लास्ट मार्बल'  आणि 2014 मध्ये 'द कॉर्नर टेबल' या शॉर्ट फिल्म्सला खूप पसंती मिळाली होती. मंजरी ने 'डंर्किक', 'द डार्क नाइट राइसेस', 'वंडर वुमन' आणि 'मिशन इम्पॉसिबल' सारख्या सिनेमांसाठी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे.

तर प्रियंका चोपड़ाच्या 'सात खून माफ' आणि रणबीर कपूरचा 'वेक अप सिड' सिनेमातही ती झळकली आहे. इतकेच नाही तर दोन्ही मुली मॅक प्रोडक्शनचे कामही उत्तम सांभाळतात.मंजरीने हॉलिवूडमध्ये काम करणारे एमानुएल पप्पलसह लग्न केले आहे.लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली.


मॅक यांनी ४६ वर्षांच्या त्या करिअरमध्ये जवळपास १७५ सिनेमात काम केले आहे. त्यांच्या काळातील सर्व बड्या चित्रपट दिग्दर्शकांबरोबर त्यांनी काम केलं होते. 'डॉन', 'कर्झ', 'सत्ते पे सट्टा', 'काला पत्थर', 'रफू चक्कर', 'शान' आणि 'शोले' या चित्रपटांमधील त्यांच्या कामांचे कौतुक झालं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच चित्रपटांत काम केलं.

 

२०१० साली  'अतिथ तुम कब जाओगे'  सिनेमाच्या शूटिंग वेळी त्यांची अचानक तब्येत खराब झाली आणि तातडीने त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. फुफ्फुसात ट्यूमर असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. यानंतर त्यांच्यावर दीर्घ उपचार केले परंतु त्यांची प्रकृती खालावत चालली होती. अखेर  10 मे 2010 रोजी मॅक मोहन यांनी जगाला कायमचा निरोप घेतला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Are o Sambaa!!! 'Sholay' fame Samba's real life daughter are also getting fame in bollywood,know How

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app