ठळक मुद्देअर्चना सांगितले होते की, “आम्ही‘लडाई’चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. या चित्रपटात माझे आणि अनुपमचे किसिंग दृश्य असावे असे दीपकचे म्हणणे होते. मला जेव्हा हे समजले तेव्हा मी घाबरले होते.

‘कुछ कुछ होता हैची मिस ब्रिगेंजा असो की‘राजा हिंदुस्तानी’मधील करिश्मा कपूरची सावत्र आई अर्चना पुरण सिंग प्रत्येक भूमिकेत अगदी फिट बसते. टेलिव्हिजन, चित्रपट ते कॉमेडी शो अशा सगळ्यांत अर्चनाने काम केले. हे सांगायचे कारण म्हणजे, आज अर्चनाचा वाढदिवस. 26 सप्टेंबर 1962 रोजी जन्मलेल्या अर्चनाने अभिनेता आदित्य पांचोलीसोबत आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर नसिरूद्दीन शहा यांच्यासोबत‘जलवा’चित्रपटात ती झळकली. हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. अग्निपथ, सौदागर, शोला और शबनम, आशिक आवारा, राजा हिंदुस्तानी अशा अनेक चित्रपटांत काम करणारी अर्चना सध्या‘द कपिल शर्मा शो’मध्ये जजची भूमिका साकारते आहे.

द कपिल शर्मा शोमध्ये काही दिवसांपूर्वी अनुपम खेर यांनी वन डे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली होती. अनुपम आणि अर्चना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. या कार्यक्रमात अर्चना पुरण सिंगने दीपक शिवदासानी दिग्दर्शित‘लडाई’चित्रपटाच्या आठवणी सांगितल्या. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, रेखा, डिंपल कपाडिया, अनुपम खेर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातील एका प्रसंगाविषयी अर्चना सांगितले होते की, “आम्ही‘लडाई’चित्रपटासाठी शूटिंग करत होतो. या चित्रपटात माझे आणि अनुपमचे किसिंग दृश्य असावे असे दीपकचे म्हणणे होते. मला जेव्हा हे समजले तेव्हा मी घाबरले होते... कारण मी पडद्यावर यापूर्वी कधीच असे दृश्य दिले नव्हते. मी दीपकला फोन करून सांगितले की, मी ते करू शकणार नाही. त्यामुळे ते दृश्य चित्रीत झालेच नाही.”
 


यावर अर्चनाने अनुपम खेर यांना विचारले की, त्यावेळी त्यांचे किरण खेर यांच्याशी लग्न झालेले असल्याने अर्चनाचे चुंबन घेण्याची त्यांना भीती वाटत होती का? त्यावर अनुपम म्हणाले,“नाही, मला किरणची भीती वाटत नव्हती. उलट, इतर अभिनेत्यांप्रमाणे मलाही किसिंग सीन करायला मिळणार म्हणून मी आनंदात होतो. पण तू तयार नसल्याचे कळल्यावर मी दीपकजींना ते दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची विनंती केली.”

Web Title: Archana Puran Singh Birthday Special: When Archana Puran Singh Was 'Nervous' to Kiss Anupam Kher in 'Ladaai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.