मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. इतेक दिवस फक्त अरबाज खानची गर्लफ्रेंड म्हणून ती चर्चेत होती. आता लवकरच  जॉर्जिया  'करोलिन कामाक्षी' नावाच्या तमिळ वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. एका इंटरव्ह्यू मध्ये जॉर्जिया म्हणाली " मी साऊथच्या प्रॉडक्शन हाऊसला एक छोटासा हिंदी चित्रपटाचा सीन अॅक्ट करून पाठवला पण त्यांना हिंदी भाषेची काही माहिती नसल्यामुळे ते विडिओ मी परत इंग्रजीमध्ये बनवून पाठवले".  त्यानंतर त्यांच्या टीमने तिला ऑडिशनचा एक भाग म्हणून तामिळमध्ये एक छोटी स्क्रिप्ट पाठवली. त्यांनतर जॉर्जियाने सर्व संवाद शिकले आणि निर्मात्यांना ते आवडलेही.

ही वेब सिरीस अ‍ॅक्शन-कॉमेडी ने भरपूर असणार, ज्यामध्ये जॉर्जिया "कारोलिन" नावाच्या फ्रेंच अंडर कव्हर एजन्टची भूमिका साकारत आहे. वेब सिरीसमध्ये जॉर्जियाचे कॅरेक्टरला सुट्टीच्या वेळी एखादा असाइनमेंट घ्यायला भाग पाडले जाते, जॉर्जियाने ह्या वेब सिरिजमध्ये काही कठीण अ‍ॅक्शन सीन करताना दिसेल आणि तिला ही अपेक्षा आहे कि हे प्रेक्षकांना खूप आवडेल.

 जॉर्जियापुढे खुलासा केला की तिला स्वत: च्या क्रेडिटवर काम मिळवायचे आहे. तिला अरबाजचा पाठिंबा तर आहेच.  परंतु तिने कधीही अरबाजची काम मिळवण्यासाठी मदत  घेतली नाही. अरबाजच्या ओळखीमुळे तिला कोणाशी संपर्क साधावा यागोष्टीची मदत होते मात्र शेवटी तिलाच स्वतःला सिद्ध करायचे असल्यामुळे अरबाज तिला पूर्ण सपोर्ट करत असल्याचे ती सांगते. 


Web Title: Arbaaz Khan's girlfriend Giorgia to debut In Tamil Web Series
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.