मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये पाहिले जाते. मात्र जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारली आहे.

 करोलिन कामाक्षी वेबसीरिजच्या लाँचवेळी जॉर्जिया तिच्या या पहिल्या वेबसीरिजमुळे खूप इमोशनल झाली होती. 


या सीरिजबद्दल जॉर्जिया म्हणाली की, मी खूप नशीबवान आहे की इतक्या चांगल्या कास्टसोबत तमीळ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. त्यांनी मला खूप सहकार्य केले. त्यामुळे त्यांची मी खूप आभारी आहे. प्रेक्षकांना माझे काम व वेबसीरिज खूप आवडेल आणि या सीरिजच्या माध्यमातून रसिकांच्या चेहऱ्यावर हसू आणेन अशी मला आशा आहे. 

करोलिन कामाक्षी वेबसीरिजमध्ये इंटरपोलची कॅरोलिन आणि सीबीआयची कामाक्षी असे दोन अधिकारी आहेत, ज्या विरोधी व्यक्तिमत्त्वाचे आहेत. परंतु धोकादायक माफिया डॉनची शिकार करण्यासाठी ते एकत्र आले आहेत. असे टीझरमध्ये दाखवले आहे. या टीझरमध्ये जॉर्जिया एक्शन आणि कॉमेडी दोन्ही करताना दिसणार आहे. या वेब सीरिजचे शूट चेन्नई आणि पाँडिचेरीमध्ये पार पडले आहे.


याव्यतिरिक्त जॉर्जिया लवकरच ‘वेलकम टू बजरंगपूर’ या चित्रपटात श्रेयस तळपदेसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Web Title: Arbaaz Khan's girlfriend Giorgia Andriani gets emotional at the karoline kamakshi event, because of this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.