अभिनेता अरबाज खानमलायका अरोरा यांचे नाते मे २०१७ संपले. १९ वर्षे एकत्र संसार केल्यावर एका वळणावर अचानक अरबाज व मलायकाने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे कायदेशीर मार्गाने घटस्फोटही घेतला. आता दोघेही आपआपल्या आयुष्यात बरेच पुढे गेले आहेत. एकीकडे मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे.


अरबाज व जॉर्जियाने त्यांच्या नात्याची कबुली दिली असली तरीपण लग्नाचे वृत्त नाकारले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अरबाजला लग्नाविषयी विचारण्यात आलं त्यावेळी तो नाराज झाला होता.


इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजनं त्याच्या पर्सनल लाइफ बद्दल दिलखुलास गप्पा मारल्या. सध्या अरबाज त्याचा आगामी चित्रपट दबंग ३च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या दरम्यान दिलेल्या मुलाखतीत जेव्हा त्याला गर्लफ्रेंड जॉर्जियाशी लग्न करण्याच्या चर्चांविषयी विचारण्यात आला त्यावेळी तो चिडला.


या मुलाखतीत अरबाजनं त्याच्या लग्नाच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, ‘आम्ही दोघं एकमेकांना डेट करत आहोत याचा अर्थ असा नाही की, आम्ही आत्ताच लग्न करावं. मी विचारतो कोणती सूत्र? माझ्या वडीलांनी हे सांगितलं का, माझ्या आईनं सांगितलं का, माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, कोणत्या खास मित्रानं हे सांगितलं का? जर यापैकी कोणी सांगितलं नाही तर मग ही सूत्र कोण आहेत.’


अरबाज पुढे म्हणाला, आम्ही हे नातं एका फ्लोमध्ये पुढे नेऊ इच्छितो. मी या नात्यात खूश आहे. मी जॉर्जियाला डेट करत आहे. मी ही गोष्ट मान्य केली आहे. पण माझ्या लग्नाबद्दल बोलायचं तर जेव्हा मी लग्न करेन त्यावेळी मी सर्वांना निमंत्रण देणार आहे. मी सर्वांना याबद्दल जाहीरपणे सांगेन.

Web Title: Arbaaz Khan On Wedding Rumors With Girlfriend Giorgia Andriani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.