Arbaaz khan spotted with his girlfriend giorgia on dinner date | मलायकाचा न्यूयॉर्कमध्ये तर अरबाज खानचा मुंबईत रोमान्स, गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट
मलायकाचा न्यूयॉर्कमध्ये तर अरबाज खानचा मुंबईत रोमान्स, गर्लफ्रेंडसोबत झाला स्पॉट

ठळक मुद्देपुन्हा एकदा ही जोडी मुंबईत एकत्र फिरताना दिसले आहेत

मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज खान इटालियन मॉडल जॉर्जियाला डेट करतोय आहे. दोघांना अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी आणि पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलेय. पुन्हा एकदा ही जोडी मुंबईत एकत्र फिरताना दिसले आहेत. दोघे मुंबईतला एक मोठ्या रेस्टॉरेंटच्या बाहेर एकत्र स्पॉट झाले.  


जॉर्जिया एंड्रियानी आणि अरबाज खानची लव्ह स्टोरी ही आता सगळ्या जगाला माहिती आहे. सध्या दोघे प्रेमाच्या अखंड सागरात बुडाले आहे. अरबाजने मुंबईत नव घरं खरेदी केलं आहे. अरबाज आणि जॉर्जियामध्ये 22 वर्षांचा फरक आहे. अरबाज 51 आणि जॉर्जिया 29 वर्षांची आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार अरबाज आणि जॉर्जिया पुढच्या वर्षी कोर्ट मॅरेज करणार आहेत. 


काही महिन्यांपूर्वी एका इव्हेंटमध्ये बोलताना अरबाज विवाहसंस्थेवर बोलला होता. ‘विवाह संस्थेला आपल्या देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेकदा लग्न तुटतात. पण याचा अर्थ विवाहसंस्था खराब आहे, असे होत नाही. मी तरूणांना लग्न करण्याचा सल्ला देईल. माझे लग्न ज्या पद्धतीने तुटले, त्याबद्दल मला जराही तक्रार नाही. अचानक काही गोष्टी बिघडल्या आणि लग्न तुटले. पण आता मी योग्य मार्गावर आहे. कदाचित मी नव्याने संसार सुरु करेल. एकदा लग्न अयशस्वी ठरले, मग दुसऱ्यांदा करून काय फायदा, असे मानणाऱ्यांपैकी मी मुळीच नाही. कदाचित मी दुसऱ्यांदा लग्न करेल. अर्थात योग्य वेळी आणि एक योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यानंतरच मी हा निर्णय घेईल,’ असे अरबाज म्हणाला होता.


Web Title: Arbaaz khan spotted with his girlfriend giorgia on dinner date
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.