Arbaaz khan girlfriend giorgia adriani dances on husn hai suhana song from coolie no 1 | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केला 'हुस्न है सुहाना' गाण्यावर धमाकेदार डान्स. VIDEO व्हायरल

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जियाने केला 'हुस्न है सुहाना' गाण्यावर धमाकेदार डान्स. VIDEO व्हायरल

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया अँड्रियानी सोशल मीडियावर आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. जॉर्जिया आपल्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळे ओळखली जाते. जॉर्जियाने आपला एका डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  यात ती 'हुस्न है सुहाना'' या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसतेय. 

जॉर्जियाचा व्हिडीओ होतोय व्हायरल 
 जॉर्जिया अँड्रियानी या डान्स व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत  आहे. जॉर्जियाने 'कुली नंबर 1'मधील 'हुस्न है सुहाना' गाण्यावर  शानदार डान्स  केले आहे.

मलायका अरोरासोबत घटस्फोट घेतल्यापासून अरबाज खान इटालियन मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतो आहे. दोघे एकमेकांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करताना दिसतात.जॉर्जिया अरबाज पेक्षा 22 वर्षांनी लहान आहे.

वयात इतकं अंतर असताना ही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. अनेक सर्वाजनिक ठिकाणी दोघ एकत्र स्पॉट झाले आहेत. जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. जॉर्जिया लवकरच 'वेलकम टू बजरंगपूर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. यात श्रेयस तळपदे, संजय मिश्रा आणि तिग्मांशू धूलिया मुख्य भूमिकेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Arbaaz khan girlfriend giorgia adriani dances on husn hai suhana song from coolie no 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.