बॉलिवूड अभिनेता, निर्माता अरबाज खान आणि त्याची पूर्वपत्नी मलायका अरोरा रोज कोणत्याना कोणत्या गोष्टीला घेऊन चर्चेत असतात. मलायका अर्जुन कपूरला डेट करते तर तर दुसरीकडे अरबाज विदेशी बाला जॉर्जियाच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे. अरबाज खानच्या लग्नाची चर्चा नेहमीच सुरु असते.

लग्नाबाबत अरबाजला नुकताच प्रश्न विचारला त्यावेळू त्याचा पार चांगलाच चढला आणि लग्नाचा सध्या कोणताच प्लॅन नसल्याचे त्याने स्पष्ट केले. 
इंडिया टीव्हीच्या रिपोर्टनुसार अरबाज खान मुलाखती दरम्याम म्हणाला, मी पुढच्या वर्षी लग्न करते हे तुम्हाला नक्की कुणी सांगितले ?, माझ्या आई-वडिलांनी, भाऊ, बहीण, ड्रायव्हर, गर्लफ्रेंड की बेस्टफ्रेंडने ? मी ज्यावेळी लग्न करेन तो सगळ्यांना ढोल वाजवून सांगेन. मी ऐकीव गोष्टींवर विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देत नाही. 


 जॉर्जिया एंड्रियानी इटालियन मॉडेल, नर्तिका व अभिनेत्री आहे. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. तिने ३०हून अधिक फॅशन शो केले आहेत आणि सर्वोत्कृष्ट फॅशन आयकॉनमध्ये तिचे नाव आहे. आता तिने तमीळ वेबसीरिजमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. या वेबसीरिजचे नाव आहे करोलिन कामाक्षी. या सीरिजमध्ये करोलिनची मुख्य भूमिका साकारली आहे. अरबाजन खान गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'दबंग 3'मध्ये दिसला होता. 

Web Title: Arbaaz khan georgia andriani wedding latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.