मलायका अरोरा सध्या तिच्या अर्जुन कपूरसोबत असलेल्या अफेअरला घेऊन चर्चेत आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला मलायकाचा पहिला पती अरबाज खान आणि तिच्या लव्हस्टोरीबाबत सांगणार आहोत. तुम्हाला हे माहिती आहे का मलायकाने अरबाजला लग्नासाठी प्रपोज केला होता. 1993मध्ये त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली.

त्यावेळी मलायका अरोरा प्रसिद्ध वीजे आणि मॉडल होती. दोघांची ओळख एका अॅड फिल्मच्या शूटिंग दरम्यान झाली होती. यानंतर जवळपास 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केले.  मलायका अरोरा व अरबाज खानने १९९८ साली प्रेमविवाह केला होता.


मलायकाने एका मुलाखती दरम्यान खुलासा केला होता की, तिने अरबाजला लग्नासाठी पहिले प्रपोज केले होते. पहिल्या नजरेत आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. 1998मध्ये आधी त्यांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम पद्धतीने विवाह केला.  २००२ साली मलायकाने अरहानला जन्म दिला. २०१६ साली त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि 11 मे, 2017 साली ते विभक्त झाले.


डेक्कन क्रॉनिकलला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानने मलायकासोबतच्या नात्याबद्दल बोलताना म्हणाला होता की, ''आम्ही बरेच वर्ष एकत्र राहिलो आणि आमच्या खूप साऱ्या आठवणी आहे. आमची मुलं ही सर्वात खास बाब आहे. त्यामुळे एकमेकांप्रती आमच्यात आदर आहे. असं काही होतं आमच्यात ज्यामुळे आम्ही विभक्त झालो. याचा अर्थ हा नाही की आम्ही एकमेकांचा द्वेष करतो. आम्ही मॅच्युएर आहोत. आम्ही आदराने सर्व गोष्टी करत आहोत.''  आता अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीला डेट करतोय. तर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये आहे.


Web Title: Arbaaz khan and malaika arrora love story
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.