OMG! लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन? जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 01:06 PM2021-05-16T13:06:08+5:302021-05-16T13:08:09+5:30

होय, या फोटोतील अनुष्काला पाहून हीच का ती देवसेना? असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. फोटोत अनुष्काचे वजन प्रचंड वाढलेले दिसतेय.

anushka shetty south actress photo viral on social media users said she put weight in lockdown | OMG! लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन? जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

OMG! लॉकडाऊनमध्ये वाढलं अनुष्का शेट्टीचं वजन? जाणून घ्या ‘या’ व्हायरल फोटोमागचं सत्य

Next
ठळक मुद्देअनुष्का लवकरच एका बिझनेसमॅनसोबत लग्न करणार असल्साचे कळतेय. एका मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार, हा बिझनेसमॅन दुबईचा आहे.

अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) साऊथची आघाडीची अभिनेत्री. पण ‘बाहुबली’नंतर बॉलिवूडप्रेमींही तिचे ‘दिवाने’ झालेत. तूर्तास काय तर अनुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
होय, या फोटोतील अनुष्काला पाहून हीच का ती देवसेना? असा प्रश्न तुम्हालाही पडल्याशिवाय राहणार नाही. फोटोत अनुष्काचे वजन प्रचंड वाढलेले दिसतेय. यात अनुष्का नो मेकअप लुकमध्ये आहे. चेह-यावरचे हास्य तेच आहे़ पण वाढलेले वजन पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
हा फोटो क्षणात व्हायरल झाला आणि सोबत चाहत्यांच्या कमेंट्सचाही पूर आला. हा लॉकडाऊनचा परिणाम आहे, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया लोकांनी दिल्या.

काय आहे व्हायरल फोटोमागचे सत्य
अनुष्का शेट्टीचा सध्या व्हायरल होत असलेला हा फोटो आत्ताचा नाही तर मागच्या वर्षीचा आहे. डिसेंबरमध्ये अनुष्का हरिद्वारला गेली होती. याच ठिकाणचा हा फोटो आहे़ अनुष्का प्रचंड श्रद्धाळू आहे. अनेक मंदिरांना, धार्मिक स्थळांना ती भेट देत असते.
अनुष्का शेट्टी सध्या तिच्या कुटुंबासोबत बेंगळुरूमध्ये आहे. तिच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सध्या तिने कामामधून ब्रेक घेतला आहे. अद्याप तिच्या नव्या सिनेमाबद्दल कहीही माहिती नाही. ‘निशब्दम’ हा तिचा अलीकडे रिलीज झालेला शेवटचा सिनेमा होता. चर्चा खरी मानाल तर लवकरच ती तेलगू स्टार नवीन पॉलिशेट्टीसोबत एका सिनेमात दिसणार आहे. पण अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.
अनुष्काने चित्रपट ‘सुपर’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 2009मध्ये आलेला प्रभाससोबतचा ‘बिल्ला, चित्रपट तिच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला. त्यानंतर तिने कधीच मागे वळून बघितले नाही. 

लग्नाच्या चर्चा

अनुष्का लवकरच एका बिझनेसमॅनसोबत लग्न करणार असल्साचे कळतेय. एका मीडिया हाऊसने दिलेल्या वृत्तानुसार, हा बिझनेसमॅन दुबईचा आहे. त्याच्या नावाचा खुलासा अद्याप झालेला नाही. पण तो अनुष्कापेक्षा वयाने लहान असल्याचे कळतेय. मध्यंतरी अनुष्का एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची बातमी होती. क्रिकेटपटू नॉर्थमधील असून साऊथ रणजी टीमसाठी खेळत असल्याचे म्हटले गेले होते. त्याच्या नावाचा मात्र खुलासा झाला नव्हता. कालांतराने या नावाचा खुलासा होईल, अशी अपेक्षा असतानाच अनुष्काने या सगळ्या अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. केवळ इतकेच नाही तर अशा खोट्या अफवा पेरणा-यांबद्दल संतापही व्यक्त केला होता.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anushka shetty south actress photo viral on social media users said she put weight in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app