ठळक मुद्देअनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट ‘सुपर’मधून पदार्पण केले होते.

‘बाहुबली 2’ या चित्रपटानंतर कधी नव्हे इतकी लोकप्रिय झालेली ‘देवसेना’ अर्थात साऊथ सुपरस्टार अनुष्का शेट्टी हिच्या लव्हलाईफच्या चर्चा सध्या तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘बाहुबली 2’ रिलीज झाल्यानंतर  अनुष्का व प्रभासच्या लव्ह लाईफच्या चर्चा रंगल्या. अगदी दोघेही लग्न करणार, असेही म्हटले गेले. पण या सगळ्या अफवा ठरल्या. अगदी अलीकडे अनुष्का प्रभासला नाही तर एका क्रिकेटपटूला डेट करत असल्याची चर्चा रंगली. ही चर्चा आणखी रंगणार, तोच आता अनुष्काने यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.


अनुष्काच्या आयुष्यात हा क्रिकेटपटू नॉर्थमधील असून साऊथ रणजी टीमसाठी खेळत असल्याची चर्चा होती. त्याच्या नावाचा मात्र खुलासा झाला नव्हता. कालांतराने या नावाचा खुलासा होईल, अशी अपेक्षा असतानाच अनुष्काने खुलासा केला. होय, आता या सगळ्या अफवा असल्याचे अनुष्काने म्हटले आहे. केवळ इतकेच नाही तर अशा खोट्या अफवा पेरणाºयांबद्दल संतापही व्यक्त केला आहे.


 ती म्हणाली, ‘आधी मी प्रेमात पडल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या. यानंतर मी सीक्रेट मॅरेज केल्याच्याही अफवा उडाल्या. आता माझे नाव कुण्या क्रिकेटपटूशी जोडले जातेय. मी त्याच्यासोबत लग्न करणार, असेही म्हटले जातेय. अशा अफवा पसरवणाºयांना मी एकच सांगेल की, काहीही बोलण्यापूर्वी वा लिहिण्यापूर्वी खात्री करा.’
 माझ्या प्रेमाबद्दल, लग्नाबद्दल काहीही बोलले गेले तरी मी याबाबतीत एकदम स्पष्ट आहे. माझ्या लग्नाचा निर्णय मी माझ्या आईवडिलांवर सोडला आहे. माझ्या लग्नाचा निर्णय तेच घेतील, असेही अनुष्काने सांगितले.  
 बाहुबली या चित्रपटामुळे अनुष्का जगभरात प्रसिद्ध झाली. अनुष्काचे खरे नाव स्वीटी शेट्टी आहे. चित्रपटसृष्टीत करियरला सुरूवात करण्यापूर्वी अनुष्का योगा इंस्ट्रक्टर होती. 

अनुष्काने २००५ साली तेलुगू चित्रपट ‘सुपर’मधून पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व आयशा टाकिया मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात तिची सपोर्टिंग भूमिका होती. यातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले आणि यानंतर अनुष्काने कधीच मागे वळून पाहिले नाही.
 मगधीरा, रुद्रमादेवी, वेदम, अरुंधति आणि सिंघम सीरिज यासारख्या अनेक चित्रपटात  तिने काम केले. 

Web Title: anushka shetty replies on her wedding with cricketer news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.