Anushka Shetty feels worry about this | अनुष्का शेट्टीला वाटतेय ह्या गोष्टीची चिंता

अनुष्का शेट्टीला वाटतेय ह्या गोष्टीची चिंता

ठळक मुद्देअनुष्का घेतेय न्यूट्रॉपॅथीची ट्रीटमेंट


हल्ली सर्वच कलाकारांना फिटनेसचे वेड लागले असून कोणी योगा करते तर कुणी जिममध्ये घाम गाळत आहे. तर कुणी डाएटवर जास्त भर देत आहे. 'बाहुबली' चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनुष्का शेट्टीला देखील आता तिच्या वाढत्या वजनाची चिंता लागून राहिली आहे. त्यासाठी आता ती प्रयत्न करते आहे.


२००५ मध्ये तेलगू सिनेमा सुपरमधून तिने पदार्पण केले होते. त्यानंतर २०१५ मध्ये साईझ झिरो या आणखी एका तेलगू सिनेमासाठी तिला तब्बल २० किलो वजन वाढवायला लागले होते. त्या सिनेमात तिला एका जाड्या मुलीचा रोल करायचा होता. त्यानंतर मात्र तिने वजन घटवायला सुरुवात केली होती. दररोज दोन तास जीममध्ये वर्कआऊट करूनही तिचे वजन आटोक्‍यात आले नाही. कदाचित यामुळेच तिला प्रभासबरोबरच्या साहोतील भूमिका सोडावी लागली होती. आता तिने नॉर्वेमधील न्यूट्रॉपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आहे. या नॅचरल थेरपीच्या आधारे वजन आटोक्‍यात येऊ शकेल, असा विश्‍वास तिला वाटतो आहे. बाहुबली आणि बाहुबली २नंतर अनुष्का आणि प्रभासचे अफेयर असल्याची चर्चा सुरू होती. पण याबाबत या दोघांनीही काहीही वाच्यता केलेली नाही. मात्र आता अनुष्काने वजन कमी करण्याचे मनावर घेतले असून लवकरच तिच्यातील बदल पाहायला मिळेल. 

Web Title: Anushka Shetty feels worry about this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.