दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीची गेल्या काही दिवसांपासून कुठेच चर्चा नव्हती. प्रभास आणि अनुष्का यांच्यात अफेअर असल्याच्या चर्चा तशा नेहमीच रंगत असतात. पुन्हा एकदा अनुष्का चर्चेत येण्यास कारणीभूत ठरला आहे तिचा हा बालपणीचा फोटो समोर आला आहे. लहानग्या अनुष्काचा क्युट अंदाज पाहायला मिळतो आहे. बोलके डोळे, स्टाइल याची झलक या फोटोत स्पष्ट पाहायला मिळत आहे. 


'बाहुबली द कनक्लुजन' या चित्रपटात आपल्या अभिनयासोबतच सौंदर्याने अनुष्काने सा-यांची पसंती मिळवली. 2005 मध्ये सुपर सिनेमातून तिने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. अनुष्का शेट्टी खासगी आयुष्यात कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट आहे. तिने बंगळूरुच्या माऊंट कार्मेल कॉलेजमधून बीसीए पूर्ण केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर अनुष्का शेट्टी योगा ट्रेनर होती. तिला दोन मोठे भाऊ आहेत.


बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करणारी प्रभास आणि अनुष्काची जोडी खऱ्या अर्थाने बाहुबली या चित्रपटामुळे अनेकांच्या मनात घर करुन गेली. विविध कार्यक्रमांना एकत्र गेल्यावर कॅमेऱ्यांच्या नजराही प्रभास आणि अनुष्कावरच खिळलेल्या असायच्या. सोशल मीडियावरही तिचे ग्लॅमरस फोटो पाहून खूप सारे लाईक्स आणि कमेंटस देत असल्याचे पाहायला मिळते. 

Web Title: Anushka Shetty childhood झicture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.