Anushka Sharma's first post after becoming a mother, special message written for Team India | आई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट आली समोर, टीम इंडियासाठी लिहिला स्पेशल मेसेज

आई झाल्यानंतर अनुष्का शर्माची पहिली पोस्ट आली समोर, टीम इंडियासाठी लिहिला स्पेशल मेसेज

बॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती अनुष्का शर्मा नुकतीच आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. बाळाच्या जन्मानंतर ती सोशल मीडियापासून दूर होती, मात्र आता १० दिवसानंतर तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे, जी खूप व्हायरल होते आहे.नुकतेच भारतीय क्रिकेट टीमने जेव्हा आस्ट्रेलियाला गाबामध्ये पराजित केले, तेव्हा अनुष्काला राहावले नाही आणि तिने गाबा टेस्ट मॅचमध्ये भारतीय टीमच्या ऐतिहासिक विजयासाठी अभिनंदन केले.

अनुष्का शर्माने इंस्टाग्राम स्टोरीवर क्रिकेट टीमचा फोटो शेयर करून लिहिले, काय विजय आहे टीम इंडिया, वाह! आगामी अनेक वर्षांसाठी प्रेरणादायी आहे हा विजय.

भारतीय टीमच्या या ऐतिहासिक विजयावर अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, बॉबी देओल आणि सनी देओल यांसारख्या अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या स्टाइलमध्ये अभिनंदन केले आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट केले की, इंडिया इंडिया.. ठोकले ऑस्ट्रेलियाला. टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा.

बॉलिवूडचा किंंग खान शाहरुखने ट्विट केले आहे की, काय शानदार विजय आहे आपल्या टीमसाठी. रात्रभर बसून मॅच पाहिली आहे आणि आता मी शांतपणे झोपणार आहे. चक दे इंडिया.


कोहली कुटुंबात या चिमुरडीचे आगमन झाल्याने प्रत्येकजण खूप आनंदित आहे.विराटचा भाऊ विकास कोहलीने सोशल मीडियावर कोहली कुटुंबातील या ‘लक्ष्मी’चा पहिला फोटो शेअर केला होता. फोटोत तिचा चेहरा दिसत नाही तर फक्त इवलीशी पावलं तेवढी दिसतात. पांढ-या शुभ्र कापडावर भाचीची इवलीशी पावलं आणि सोबत तिचे स्वागत करणारी कार्टून पात्र असा एक काही सेकंदांचा व्हिडीओव फोटो त्याने पोस्ट केला होता.अनुष्का व विराट यांनी आपल्या लेकीचे नाव अन्वी ठेवल्याचे कळतेय. अनुष्का आणि विराट या नावाला मिळून अन्वी असे नामकरण करण्यात आल्याचे कळतेय. अर्थात अद्याप विरूष्काने अद्याप अधिकृतपणे तिच्या नावाची घोषणा केलेली नाही. अन्वी म्हणजे लक्ष्मी. विरूष्काच्या घरात लक्ष्मी आली आहे आणि त्याअर्थाने हे नाव अगदीच समर्पक आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anushka Sharma's first post after becoming a mother, special message written for Team India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.