ठळक मुद्देविराट व अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी  इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली यांच्यासाठी आजचा दिवस खास दिवस. होय, विरूष्का आज लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. या प्रसंगी दोघांनीही काही रोमॅन्टिक थ्रोबॅक फोटो शेअर करत, एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अनुष्काने लग्नाचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर करत विराटसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे. सुप्रसिद्ध कवी विक्टर ह्युगोच्या रचनेची एक ओळ लिहित, तिने लिहिले, ‘एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे, त्यात परमेश्वराचा चेहरा पाहणे. प्रेम ही फक्त जाणीव किंवा भावना नाही तर त्याहूनही अधिक काहीतरी आहे. मी नशिबवान आहे की, मला हे मिळाले.’


विराटनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत, अनुष्काला लग्नाच्या वाढदिवसाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘जगात प्रेमाशिवाय दुसरे काहीही नाही.  देव  तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती देतो,जी प्रत्येक दिवशी याच गोष्टीची जाणीव करून देते. तेव्हा तुम्ही फक्त आभार व्यक्त करू शकता,’ असे त्याने लिहिले.


विराट व अनुष्काने 11 डिसेंबर 2017 रोजी  इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. त्याआधी 2013 पासून हे दोघे एकमेकांना डेट करत होते. दोघांनीही हे नाते जगापासून लपवून ठेवले आणि एकदिवस अचानक त्यांच्या लग्नाचेच फोटो समोर आले. इटलीत अगदी खासगी समारंभात विराट व अनुष्का लग्नबंधनात अडकले. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या लग्नाचे काही मोजकेच फोटो समोर आले होते. 

 

Web Title: anushka sharma virat kohli wish each other wedding anniversary share romantic throwback pictures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.