अनुष्का शर्मा गरोदरपणात वापरलेले कपडे विकून वाचवणार 2.5 लाख लीटर पाणी, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 12:49 PM2021-06-29T12:49:36+5:302021-06-29T12:50:50+5:30

अनुष्काच्या प्रेग्नंसी काळातील फॅशनेबल व स्टायलिश कपड्यांची बरीच चर्चा झाली होती. आता हेच फॅशनेबल व स्टायलिश कपडे एका खास कारणासाठी विकण्याचा निर्णय अनुष्काने घेतला आहे.

Anushka Sharma puts her maternity clothes for sale | अनुष्का शर्मा गरोदरपणात वापरलेले कपडे विकून वाचवणार 2.5 लाख लीटर पाणी, जाणून घ्या कसं?

अनुष्का शर्मा गरोदरपणात वापरलेले कपडे विकून वाचवणार 2.5 लाख लीटर पाणी, जाणून घ्या कसं?

googlenewsNext
ठळक मुद्देअनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. 

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या पती विराट कोहली व लेक वामिकासोबत इंग्लंडमध्ये आहे. याचवर्षी अनुष्काने मुलीला जन्म दिला. प्रेग्नंसी काळातील अनुष्काच्या फॅशनेबल व स्टायलिश कपड्यांची बरीच चर्चा झाली होती. आता हेच फॅशनेबल व स्टायलिश कपडे एका खास कारणासाठी विकण्याचा निर्णय अनुष्काने घेतला आहे. ( Anushka Sharma  puts her maternity clothes for sale)

या कपड्यांच्या ऑनलाईन विक्रीतून मिळणारा पैसा स्रेहा मातृत्व सुरक्षा या एनजीओला ती दान करणार आहे. शिवाय यातून 2.5 लाख लीटर पाणीही वाचवणार आहे.  याद्वारे ‘सकुर्लर इकॉनॉमी’ला प्रोत्साहन देणे हा  अनुष्काचा उद्देश आहे. प्रेग्नंसीदरम्यानच तिला ही कल्पना सुचली होती.

ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनुष्काने याबाबत माहिती दिली. तिने सांगितले, ‘पर्यावरण सुरक्षेच्यादृष्टीने हा एक अतिशय साधासोपा मार्ग आहे. गरोदरपणाचा काळ हा प्रत्येक महिलेसाठी अतिशय खास काळ असतो. याचा उपयोग सकुर्लर इकॉनॉमीसाठी का करू नये? असा एक विचार माझ्या डोक्यात आला आणि मी सुरूवात केली. भारतात राहणा-या १ टक्के  गरोदर महिलांनी नव्या कपड्यांऐवजी हे जुने मॅटर्निटी कपडे खरेदी केले तरी यातून पाणी वाचू शकते. इतके की, एक माणूस 200 वर्षे हे पाणी पिऊ शकतो,’ असे अनुष्का म्हणाली.

सर्कुलर फॅशन वा सर्कुलर इकॉनॉमीअंतर्गत कपड्यांना खास पद्धतीने बनवले जातात. ते पुन्हा पुन्हा वापरता यावेत, यासाठी त्यांच्या टिकाऊपणाकडे खास लक्ष दिले जाते. शिवाय हे कपडे बनवताना पर्यावरणाची खास काळजी घेतली जाते. पर्यावरणाचा कमीत कमी -हास होईल आणि अधिकाधिक लोकांना ते वापराता येतील, या पद्धतीने हे कपडे बनवले जातात. 
अनुष्का शर्माच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती शाहरूख खान आणि कतरिना कैफसोबत 'झिरो' चित्रपटात दिसली होती. त्यानंतर तिने ब्रेक घेतला होता. 

Web Title: Anushka Sharma puts her maternity clothes for sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.