Anushka Sharma had to undergo expensive lip surgery, 2 years later she explained the real reason behind it | अनुष्का शर्माला ओठांची सर्जरी करणं पडलं होतं महागात, २ वर्षांनंतर सांगितलं त्यामागचं खरं कारण

अनुष्का शर्माला ओठांची सर्जरी करणं पडलं होतं महागात, २ वर्षांनंतर सांगितलं त्यामागचं खरं कारण

अनुष्का शर्मा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. २०१४ साली अनुष्का शर्माने तिच्या ओठांसोबत असे काही केले ज्यानंतर ती खूप चर्चेत आली होती. अचानक तिचे ओठ वेगळे दिसायला लागले आणि तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१६ साली तिने लिप सर्जरी केल्याचे कबूल केले होते.

२०१६ मध्ये व्होग या मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान अनुष्काने तिने लिप सर्जरी केल्याचे स्वीकार केले होते. तिने म्हटले होते की, मी कधीही काहीही लपवले नाही. जेव्हा मी माझा ओठांवर शस्त्रक्रिया केली.

तेव्हा मी हे सांगितले होते. खूप साऱ्या लोकांनी यासाठी माझे कौतुक केले होते आणि मला धाडसी सुद्धा म्हटले होते.  मी हे सगळं माझा कामाचा एक भाग म्हणून केले होते. ‘बॉम्बे वेलवेट’ या चित्रपटामध्ये माझा भूमिकेसाठी मला ‘लीप जॉब’ करणे गरजेचे होते. म्हणून मी हे धाडस केले होते आणि मी ही गोष्ट कधीच लपवली नाही. मला वाटत होते की माझा चाहत्यांना देखील ही गोष्ट कळावी आणि त्यानाही कळावे की मीसुद्धा एक माणूस आहे मीसुद्धा अपरिपूर्ण असू शकते. २०१४ मध्ये अनुष्काने म्हटले होते की तिने टेम्पररी लीप इनहान्सिग टूल आणि मेकअप टेक्निकचा वापर केला आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, शाहरूखसोबतचा ‘झिरो’ हा अनुष्काचा अलीकडचा अखेरचा सिनेमा होता. या सिनेमानंतर अनुष्काने अद्याप नव्या सिनेमाची घोषणा केलेली नाही. चर्चा खरी मानाल तर अनुष्काने महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामीचे बायोपिक साईन केले आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anushka Sharma had to undergo expensive lip surgery, 2 years later she explained the real reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.