सेलिब्रेटी जे काही करतात त्याची चर्चा नाही झाली तरच नवल. नुकतेच अनुष्का शर्माने एका एव्हेंटमध्ये पोहताच नेहमी प्रमाणे तिचा स्टायलिश लूक पाहायला मिळाला. यावेळी तिच्या स्टाइलमध्ये एक वेगळ्याच गोष्टीची चर्चा रंगली होती ते म्हणजे यावेळी अनुष्काने कानाला सोन्याचे ईअर कफ घातले होते. अनुष्काचे हेच ईअर कफने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते.

विशेष म्हणजे अशाच प्रकारचे ईअर कप टेनिस प्लेअर  सेरेना विलिम्सने आपल्या एका फोटोशूट वेळी घातले होते. त्यामुळे तिने सेरेनाची स्टाइल कॉपी केली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. यानुसार सोन्याचे ईअर कफ घालणारी अनुष्का जगातील दुसरी महिला अभिनेत्री बनली आहे. 

अनुष्का प्रमाणेच पती विराटचेहे असेच महागडे छंद आहेत.  विराट कोहली हा फक्त क्रिकेटसाठी ओळखला जात नाही, तर तो आपल्या स्टाइलसाठीही ओळखला जातो. काही दिवसांपूर्वीच महागड्या घड्याळ्यामुळे चर्चेत होते . विराटच्या या घड्याळ्यामध्ये सोन्यासहीत काही हिरे, माणिक असल्याचीही चर्चा  झाल्या होत्या. 

वाचा, विरूष्काच्या हनिमूनचा किस्सा !

 


विराट कोहलीने यावेळी हनिमूनचा एक इंटरेस्टिंग किस्साही सांगितला. त्याने सांगितले की, लग्नानंतर आम्ही फिनलँडला हनिमूनला गेलोत. आम्हाला कुणीच ओळखणार नाही, असे ठिकाण आम्हाला हवे होते. म्हणून आम्ही फिनलँडची निवड केली होती. आम्ही एका कॉफीशॉपमध्ये गेलो. आम्हाला इथे कुणीच ओळखत नाही, या आनंदात आम्ही होतो. पण कॉफीशॉपमध्ये माझ्या समोरच्या टेबलावर एक शिख व्यक्ती बसलेली होती.
मी लगेच माझा चेहरा कॉफीच्या मगने लपवण्याचा प्रयत्न केला.

 

पण त्याने आम्हाला ओळखलेच. तो आमच्याजवळ आला आणि तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. माझे आडनावसुद्धाकोहली आहे, असे म्हणाला. आमच्यासाठी हे अनपेक्षित आणि मजेशीर होते. जगात एखादे तरी ठिकाण आहे का, जिथे कोणीच आम्हाला ओळखू शकणार नाही, असा विचार करून मी व अनुष्का खूप हसलो होतो.

Web Title: Anushka Sharma Becomes 2nd female Actress In The World To Use Golden Ear cuff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.