Anushka sharma and kareena kapoor khan congratulates manish malhotra on birthday | अनुष्का शर्मा आणि करीना कपूरने मनीष मल्होत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिला स्पेशल मेसेज

अनुष्का शर्मा आणि करीना कपूरने मनीष मल्होत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिला स्पेशल मेसेज

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्राला अभिनेत्री करीन कपूर खान आणि अनुष्का शर्माने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. लवकरच आई होणाऱ्या अनुष्का शर्मा आणि करीना कपूरने मनीष मल्होत्रासाठी एक खास संदेश लिहिला आहे. अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मनीषचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे, 'हॅपी बर्थडे'. मला माहित असलेल्या तुम्ही एक अतिशय हुशार आणि फॅशनेबल लोकांपैकी एक आहात.

अनुष्का शर्माशिवाय करिष्मा कपूर, रिद्धिमा कपूर, आदित्य शेट्टी, कतरिना कैफ, आलिया भट्ट, मलायका अरोरा आणि पुनीत मल्होत्रा ​​यांनीही मनीष मल्होत्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अभिनेत्री करीना कपूरने मनीष मल्होत्राला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा देताना लिहिले की, 'माझा मित्र आणि भाऊ मनीष मल्होत्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. लोलोसाठी सूट ते रेड लेदर पॅन्ट, पटियाला सलवार आणि साडीपर्यंत सगळे तू डिझाइन करत आला आहेस. माझ्या आयुष्यात तुम्हाला एक विशेष स्थान आहे. करिना कपूर सध्या गर्भवती आहे आणि अभिनेता पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर अलीसमवेत हिमाचल प्रदेशच्या धर्मशालामध्ये वेळ क्वॉलिटी टाईम स्पेंट करतेय.

अनुष्का शर्मा प्रेग्नेंट आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या घरी जानेवारीत नवा पाहुणा येणार आहे. सध्या अनुष्का मुंबईत आहे. अनुष्का शर्माने नुकतेच बॉम्बे टाइम्सशी बोलताना खासगी गोष्टींवर चर्चा केली. अनुष्का म्हणाली की, ती आई बनण्यासाठी जेवढी उत्सुक आहे तेवढी कामावर परतण्यासाठी उत्सुक आहे. ती म्हणाली की, आई बनल्यानंतर लगेच शूटिंग सेटवर परतणार आहे. मी असे प्लानिंग करणार आहे ज्यात मी बाळ, घर आणि काम यांच्यामध्ये समतोल साधू शकेन.मी जोपर्यंत जिंवत आहे तोपर्यंत काम करत आहे. कारण मला अभिनयातून खूप आनंद मिळतो.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anushka sharma and kareena kapoor khan congratulates manish malhotra on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.