अभिनेत्री कल्कि कोचलीन लवकरच आई होणार आहे. सोशल मीडियावर आणि बी-टाऊनमध्ये कल्किच्या प्रेग्नेंसीची जोरदार चर्चा आहे. कल्किने ही गुडन्यूज सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वत: आपल्या फॅन्ससोबत शेअर केली. बेपी बंपचा फोटो तिने शेअर करत ही गुडन्यूज दिली होती. 

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कल्की पाच महिन्यांची प्रेग्नंट आहे आणि लवकरच बाळाला जन्म देणार आहे. वॉटर बर्थद्वारे ती बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले होते. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार कल्किचा एक्स पती अनुराग कश्यपने तिचे पेरेंट्स कल्बमध्ये वेलकम केले आहे आणि कोणत्याही गोष्टीची गरज भसल्यास नक्की सांग असे सांगितले आहे.

 2009 मध्ये ‘देव डी’ या चित्रपटाच्या सेटवर कल्की  दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या प्रेमात पडली होती. यानंतर 2011 मध्ये दोघांनीही लग्न केले होते. पण हे नाते फार काळ टिकले नाही. 2015 मध्ये दोघांचाही घटस्फोट झाला. पण घटस्फोटानंतरही आजही कल्की व अनुराग कश्यप एकमेकांचे चांगले मित्र आहेत. कल्कीला घटस्फोट दिल्यानंतर अनुराग शुभ्रा शेट्टी या त्याच्यापेक्षा 21 वर्षांनी लहान तरूणीच्या प्रेमात पडला. पण कल्की आत्तापर्यंत सिंगल होती.

सध्या कल्की इस्रायली पियानो वादक Guy Hershberg  याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. कल्कीने काही दिवसांपूर्वी त्याच्यासोबतचा फोटो शेअर करत, हे नाते जगजाहिर केले होते. या फोटोत कल्की बॉयफ्रेन्डला किस करताना दिसली होती आणि आता कल्कि त्याच्या बाळाची आई होणार आहे.     

Web Title: Anurag kashyap reaction on kalki koechlin pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.