ठळक मुद्देसिकंदर हा अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे.

अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेर अलीकडे डिज्नी प्लस हॉट स्टारची वेबसीरिज ‘आर्या’मध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये सिकंदर लीडमध्ये नव्हता. पण त्याने यात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. यानंतर नुकत्याच प्रदर्शित ‘मुम भाई’ या सीरिजमध्ये तो दिसला. लवकरच अक्षय कुमार स्टारर ‘सूर्यवंशी’ या सिनेमातही सिकंदर महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. मात्र याऊपरही मला काम हवे, म्हणत सिकंदर सोशल मीडियावर पोस्ट टाकली आहे. मात्र त्याच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील त्याच्या मित्रांनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

सिकंदरने इन्स्टावर एक गंभीर चेहºयातील फोटो शेअर केला. ‘कामाची गरज आहे. हसू पण शकतो,’ असे या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले. या पोस्टनंतर आपल्याला काम मिळेल, अशी सिकंदरची अपेक्षा असावी.  पण झाले भलतेच. सिकंदरच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्याची मजा घेतली. विशेषत: इंडस्ट्रीतील मित्रांनी त्याच्या या पोस्टवर मजेदार कमेंट केल्या.

दिग्दर्शक अपूर्व लाखियाने सिकंदरच्या या पोस्टवर  जबरदस्त कमेंट केली. ‘सर, अमिताभ बच्चननंतर मी आणखी कोण्या बिझी अ‍ॅक्टरला ओळखतो तर तो तू आहेस,’ असे अपूर्वने लिहिले. यावर सिकंदरने लगेच उत्तरही दिले. ‘सर क्या आप चाहते हैं की मैं चुल्लू भर पानी में डुब जाऊं,’ असे सिकंदर यावर म्हणाला. अभिनेता अंगद बेदीने सिकंदरच्या पोस्टवर खूपसारे स्माईली पोस्ट केलेत.

सिकंदर हा अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांच्या पहिल्या पतीचा मुलगा आहे. 1980 मध्ये किरण चंदीगडवरून मुंबईला आल्या. येथे त्यांची ओळख बिझनेसमॅन गौतम बेरीसोबत झाली. पुढे दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर वर्षभरातच किरण आई झाली. सिकंदर खेर हा किरण आणि गौतम यांचा मुलगा आहे. सिकंदर चार पाच वर्षांचा असतानाच या लग्नात आपण आनंदी नाही, हे किरण व गौतम दोघांनाही कळून चुकले होते. यामुळे दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला. पुढे किरण खेर यांच्या आयुष्यात अनुपम खेर आले व किरण यांनी त्यांच्यासोबत दुसरा संसार थाटला.  सिकंदर व अनुपम यांच्यात खूप चांगले बॉन्डिंग आहे. 

 विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या किरण खेर, इंटरेस्टिंग आहे त्यांची लव्ह स्टोरी

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anupam kher son sikandar asks work on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.