.. यांनी मला ओळखलं नाही, डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीयं...! अनुपम खेर यांचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 02:51 PM2021-06-24T14:51:09+5:302021-06-24T14:51:28+5:30

Anupam Kher Funny Video : मला वाटतं होतं प्रत्येकजण मला ओळखतो. मात्र ज्ञानचंदजींमुळे माझ्या आत्मविश्वासाला तडे गेले, असं कॅप्शन देत अनुपम यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

anupam kher shares a video as a himachal pradesh resident fails to recognize the actor | .. यांनी मला ओळखलं नाही, डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीयं...! अनुपम खेर यांचा व्हिडीओ व्हायरल

.. यांनी मला ओळखलं नाही, डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीयं...! अनुपम खेर यांचा व्हिडीओ व्हायरल

Next
ठळक मुद्देअनुपम खेर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत सिमला इथं निवांत वेळ घालवत आहेत.

अनुपम खेर (Anupam Kher ) बॉलिवूड दिग्गज अभिनेते.अगदी जगभरात त्यांचा चाहता वर्ग आहे. शेकडो सिनेमांत काम करणाºया अनुपम यांना कोण ओळखत नाही. पण अपवाद व्हिडीओतील या माणसाचा. होय,ज्ञानचंद त्याचं नाव. डोक्याला खूप ताण देऊनही हा ज्ञानचंद अनुपम यांना ओळखू शकला नाही. हे पाहून अनुपम स्वत:ही हैराण झालेत. 518 सिनेमांमध्ये काम करूनही मला यांनी ओळखलेलं नाही. डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीय, असं म्हणत अनुपम यांनी या ज्ञानचंदचा एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. (Anupam Kher Funny Video )
अनुपम खेर सध्या आपल्या कुटुंबियांसोबत सिमला इथं निवांत वेळ घालवत आहेत. सकाळी सकाळी अनुपम मॉर्निंग वॉकला निघाले आणि वाटेत त्यांना ज्ञानचंद भेटला. अनुपम यांनी त्याची आस्थेने विचारपूस केली. तुम्ही कुठे राहता? तुमचं घर किती दूर आहे? असे सगळे प्रश्न ते करतात. ते त्याचं नावही विचारतात. यावर माझं नाव ज्ञानचंद असल्याचे तो सांगतो.

यावर, तुम्ही मला ओळखता का? असा प्रश्न अनुपम करतात. यावर तो ‘नाही’ असं उत्तर देतो. तोंडावर मास्क असल्याने कदाचित ह्यांनी आपल्याला ओळखलं नसावं, असं समजून अनुपम मास्क काढतात.  मास्क काढून पुन्हा आता मला ओळखलं का? असा प्रश्न ते  विचारतात. यावर ‘सर तुमचं नाव लक्षात नाही’ असं उत्तर ज्ञानचंद देतो आणि ते ऐकल्यावर अनुपम हैराण होतात.   
518 सिनेमांमध्ये काम करूनही मला यांनी ओळखलेलं नाही. डबक्यात बुडून मरण्याची वेळ आलीय, असं ते म्हणतात. शिवाय असं म्हणून रडवेला चेहरा करतात. अर्थात  सिमला सारख्या छोट्याश्या शहरात राहण्याचा हाच आनंद असल्याचं ते व्हिडीओत सांगतात.
‘ रिअ‍ॅलिटी चेक. मी जगासमोर अगदी छाती फुगवून मी 518 सिनेमांमध्ये काम केल्याचं सांगतो. मला वाटतं होतं प्रत्येकजण मला ओळखतो. मात्र ज्ञानचंदजींमुळे माझ्या आत्मविश्वासाला तडे गेले. त्यांना मी कोण आहे हे माहित नव्हतं. खरं तर हे मजेशीर आणि सुंदर होतं. मला पुन्हा एकदा जमिनीवर आणण्यासाठी धन्यवाद मित्रा, ’  असं सुंदर कॅप्शन देत अनुपम यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: anupam kher shares a video as a himachal pradesh resident fails to recognize the actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app