आजारी बायकोसाठी अनुपम यांनी घेतला मोठा निर्णय, ‘न्यू एमस्टरडम’ला टाटा-बायबाय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 04:40 PM2021-04-15T16:40:55+5:302021-04-15T16:43:29+5:30

सध्या अनुपम किरण यांची देखभाल करत आहेत. इतकेच नाही पत्नीची आणखी चांगली काळजी घेता यावी, म्हणून त्यांनी एक मोठा प्रोजेक्टही सोडला आहे.

anupam kher exits nbc medical drama new amsterdam as a series regular for kirron kher | आजारी बायकोसाठी अनुपम यांनी घेतला मोठा निर्णय, ‘न्यू एमस्टरडम’ला टाटा-बायबाय

आजारी बायकोसाठी अनुपम यांनी घेतला मोठा निर्णय, ‘न्यू एमस्टरडम’ला टाटा-बायबाय

googlenewsNext
ठळक मुद्देकिरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर   यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांच्या पत्नी व अभिनेत्री किरण खेर (Kirron Kher) सध्या कॅन्सरला झुंज देत आहेत. किरण यांना मल्टिपल मायलोमाने ग्रासले आहे. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. अनुपम यांनी काही दिवसांपूर्वी पत्नीच्या आजाराबद्दल माहिती दिली होती. सध्या अनुपम किरण यांची देखभाल करत आहेत. इतकेच नाही पत्नीची आणखी चांगली काळजी घेता यावी, म्हणून त्यांनी एक मोठा प्रोजेक्टही सोडला आहे.

अनुपम यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल एनबीसीची सीरिज ‘न्यू एमस्टरडम’ला (New Amsterdam)  रामराम ठोकला आहे. या लोकप्रिय सीरिजमध्ये ते डॉक्टर विजय कपूर ही व्यक्तिरेखा साकारत होते. 2018 पासून अनुपम या सीरिजचा भाग होते. ही एक मेडिकल ड्रामा सीरिज आहे. सध्या या सीरिजचा तिसरा सीझन सुरू आहे. पत्नीजवळ राहून तिला पुरेपूर वेळ देता यावा, तिची काळजी घेता यावी, यासाठी अनुपम यांनी ही सीरिज सोडल्याचा निर्णय घेतल्याचे कळते.

गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला किरण खेर यांना चंदीगड येथील राहत्या घरी डाव्या हाताला दुखापत झाली होती. चंदीगडच्या पोस्ट ग्रॅच्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिचर्स येथे त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या गेल्या होत्या. यावेळी त्यांना मल्टिपल मायलोमा झाल्याचे निदान झाले होते. हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे. हा कॅन्सर त्यांच्या डाव्या हातापासून उजव्या खांद्यापर्यंत पोहोचला होता. त्यामुळे गेल्या 4 डिसेंबरला त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले होते.

अलीकडे केलेल्या वैद्यकीय चाचण्यांवरून कॅन्सरचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या 4 महिन्यांत त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. आता त्यांना रूग्णालयात भरती होण्याची गरज नाहीये. फक्त चाचण्या व उपचारासाठी नियमितपणे रूग्णालयात जावे लागणार आहे.
किरण खेर यांनी 1985 साली अभिनेते अनुपम खेर   यांच्यासोबत लग्न केले. त्या दोघांची पहिल्यांदा चंडीगढमध्ये भेट झाली होती. ते दोघे एकाच थिएटरमध्ये काम करत होते. कामादरम्यान ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

  
 

Web Title: anupam kher exits nbc medical drama new amsterdam as a series regular for kirron kher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.