अनुपम खेर ‘बेस्ट अ‍ॅक्टर’; न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 10:01 AM2021-05-07T10:01:18+5:302021-05-07T10:03:31+5:30

‘हॅपी बर्थ डे’ ही शॉर्टफिल्म जगभर चर्चेत आहे. यात अनुपम खेर यांच्यासोबत अहाना कुमरा मुख्य भूमिकेत आहे.

Anupam Kher bags Best Actor Award at New York City International Film Festival for happy birthday | अनुपम खेर ‘बेस्ट अ‍ॅक्टर’; न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा पुरस्कार

अनुपम खेर ‘बेस्ट अ‍ॅक्टर’; न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये मिळाला मानाचा पुरस्कार

Next
ठळक मुद्देन्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये ‘हॅपी बर्थडे’ने बेस्ट अ‍ॅक्टरसोबतच बेस्ट फिल्मचा अवार्डही आपल्या नावे केला.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher ) यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अनेक हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसलेल्या अनुपम यांना आता न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट अ‍ॅक्टर’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ‘हॅपी बर्थडे’ (Happy Birthday)  या शॉर्टफिल्मसाठी त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. (Anupam Kher bags Best Actor Award at New York City International Film Festival)
अनुपम यांनी स्वत: ही माहिती दिली आहे.  इतक्या प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

‘इतक्या मोठ्या पुरस्कारासाठी मी न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आभार व्यक्त करतो. या फेस्टिवलमध्ये मला बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून निवडणे जाणे सन्मानाची बाब आहे. याचे संपूर्ण श्रेय हॅपी बर्थडेच्या संपूर्ण टीमला आणि माझी को-स्टार अहाना कुमराला जाते. दिग्दर्शक प्रसाद कदम, पटकथा लेखक, प्रॉडक्शन टीम व चाहत्यांचे आभार,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
‘हॅपी बर्थडे’ ही शॉर्टफिल्म जगभर चर्चेत आहे. यात अनुपम खेर यांच्यासोबत अहाना कुमरा मुख्य भूमिकेत आहे. प्रसाद कदम यांनी ही शॉर्टफिल्म दिग्दर्शित केली आहे. अनुपम व अहाना कुमार याआधी ‘ए अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’मध्ये एकत्र दिसले होते.
 
‘बेस्ट फिल्म’चाही अवार्ड

न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलध्ये ‘हॅपी बर्थडे’ने बेस्ट अ‍ॅक्टरसोबतच बेस्ट फिल्मचा अवार्डही आपल्या नावे केला. एकाचवेळी दोन पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण टीम सध्या आनंदात आहे. निर्माते गिरीश जौहर यांनीही याबद्दल आनंद व्यक्त केला.  

  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anupam Kher bags Best Actor Award at New York City International Film Festival for happy birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app