1990 साली आलेल्या 'आशिकी' चित्रपटाने अनुला रातोरात स्टार बनवले होत. या सिनेमानंतर अनुने अनेक सिनेमात काम केले पण तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही. सध्या ग्लॅमर वर्ल्डपासून दूर असलेली अनु अग्रवाल झोपडपट्टीत जाऊन लहान मुलांना योगा शिकवते. अनु अग्रवाल तिचे अनेक फोटोज् नेहमी शेअर करत असते. ‘आशिकी’ सिनेमाने तिला एका रात्रीत स्टार केले आणि नियतीने एकाच रात्रीत तिला बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेपासून दूर केले.

एका अपघाताने तिचे अख्खे आयुष्य बदलले. 1999 साली झालेल्या एका अपघातानंतर तिचे आयुष्यच बदलले. या अपघातात तिचा स्मृतीभ्रंश झाला आणि ती पॅरालाईज्ड झाली.जवळपास ती २९ दिवस कोमामध्ये होती. डॉक्टरांना तिची जगण्याची गॅरंटी दिली नव्हती. अशातूनही अनु सुखरुप बाहेर आली.

आशिकीनंतर अनुने ‘गजब तमाशा’, ‘खलनायिका’, ‘किंग अंकल’, ‘कन्यादान’, ‘बीपीएल ओए’ आणि ‘रिटर्न टू ज्वेल थीफ’ या चित्रपटात काम केले पण तिला यश मिळाले नाही.अनुने तामिळ सिनेमा ‘थिरुदा-थिरुदा’आणि शॉर्ट फिल्म ‘द क्लाऊड डोर’मध्येही काम केले. यासोबतच तिने एमटीव्ही व्हीजे म्हणूनही काम केले. 

सुदैवाने ती कोमातून बाहेर आली पण तोपर्यंत आयुष्य बदलले होते. भूतकाळातील काहीही अनुला आठवेना. पुढे स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी अनु बिहार येथील मुंगेरस्थित प्रसिद्ध योग साधना केंद्रात गेली. स्मरणशक्ती पुन्हा मिळविण्यासाठी तिने कठीण योगसाधना केली. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर अनुची स्मरणशक्ती पूर्वपदावर आली खरी. पण तोपर्यंत बराच काळ लोटला होता. या काळात बॉलिवूडमधील लोकांनाही तिचा विसर पडला होता.


सुरुवातीपासूनच अनु योगाभ्यास करत आली आहे. त्यामुळे तिच्या आजारपणातही तिने योगाचाच आधार घेतला.  २९ दिवसानंतर कोमामधून सुरक्षित बाहेर आली याचे श्रेय योगालाच जाते. त्यामुळे नित्यनियमाने ती योगाभ्यास करते. इतरांनाही योगा करण्याचा ती सल्ला देते.अध्यात्मकडेही ती वळली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांसह सकारात्मक विचार शेअर करत असते. कठिण काळात नेहमीच मेडीटेशन करण्याचाही ती सल्ला देते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anu Aggarwal Opens Up On How She Had A Lonely Life Despite The Success Of Aashiqui

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.