बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री सारा अली खान यांचा 'लव्ह आज कल २' चित्रपट नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेत्री प्रणती राय प्रकाश देखील झळकली होती. त्यानंतर आता ती टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरच्या कॅम्पमध्ये सहभागी झाली आहे. ती लवकरच ऑल्ट बालाजीची वेबसीरिज कार्टेलमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तिच्या भूमिकेबद्दल जर आपण बोललो तर ही कथा तिच्या वास्तविक जीवनापेक्षा खूप वेगळी आहे.  


ही मालिका ऑल्ट बालाजीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये रित्विक धनंजानी , सुप्रिया पाठक, तनुजा विरवानी सारखे कलाकार दिसणार आहेत. या वेबसीरिजचे दिग्दर्शन सुयश वाधवकर करीत आहेत.


अभिनेत्री प्रणती कार्टेलमधील तिच्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे, ती म्हणाली, "माझी भूमिका सुमी माझ्यापेक्षा खूपच वेगळी आहे, तरीही मी त्या भूमिकेला स्वतःशी कनेक्ट करू शकते. मी नेहमी भूमिकेला एक आव्हान म्हणून घेते आणि ती व्यक्तिरेखा साकारण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करते, म्हणूनच मला माझे काम आवडते, कारण या कामातून मला बरेच काही शिकायला मिळते. मी सुमीची भूमिका प्रेक्षकांसमोर खूप सुंदर पद्धतीने प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करते आहे."


प्रणतीच्या आतापर्यंतच्या प्रवास म्हणजे ‘इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल’ ते लव्ह आज कल २ पर्यंतचा प्रवास साधारण नव्हता. तिने फक्त मॉडलिंग विश्वात आपले नाव कमावले नाही तर एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणूनही प्रचलित झाली आहे. यापूर्वी प्रणतीने पॉइजन या वेब फिल्ममध्ये पण काम केले आहे.


प्रणती, जिमी शेरगिल आणि माही गिल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "फॅमिली ऑफ ठाकूरगंज" चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

या चित्रपटापासून ती एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होती आणि तिचा शोध इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटावर संपला. 

Web Title: Another new face in Ekta Kapoor's camp, actress Pranati Rai Prakash is very glamorous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.