Ankita Lokhande still remembers Sushant Singh Rajput, says - 'Even today there is a thorn in the flesh ...' | अंकिता लोखंडेला आजही येते सुशांत सिंग राजपूतची आठवण, म्हणते - 'आजही अंगावर काटा येतो...'

अंकिता लोखंडेला आजही येते सुशांत सिंग राजपूतची आठवण, म्हणते - 'आजही अंगावर काटा येतो...'

अभिनेत्री अंकिता लोखंडेचे २०१६ साली सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाले आणि तिने विकी जैनसोबत नवीन आयुष्याला सुरूवात केली आहे. मात्र आजही तिला सुशांत सिंग राजपूतची आठवण येते. मकर संक्रांतीच्या निमित्ताने अंकिता लोखंडेला दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण आली असून तिने पुन्हा एकदा तिच्या अवस्थेबद्दल सांगितले आहे.


अंकिता लोखंडेने इंस्टाग्रामवर मकर संक्रांतीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती पतंग उडवताना दिसते आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला सुशांत सिंग राजपूतच्या काय पो छे चित्रपटातील गाणं ऐकायला मिळते आहे. हा व्हिडीओ शेअर करत अंकिता लोखंडेने लिहिले की, आताही माझ्या अंगावर काटा उभा राहतो, जेव्हा मी हे गाणे ऐकते. किती छान चित्रपट होता आणि अविस्मरणीय आठवणींसोबत काय प्रवास होता तो.सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.


या व्हिडीओचे एडिटिंग तन्मय खुटलने केले आहे. या व्हिडीओवर टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमधील सेलिब्रेटींसोबत सुशांतचे चाहते कमेंट करत आहेत.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत बराच काळ रिलेशनशीपमध्ये होते. त्या दोघांमध्ये पवित्र रिश्ता मालिकेत काम करत असताना जवळीक वाढली होती. २०११ साली सुशांत सिंग राजपूतने डान्स रिएलिटी शो झलक दिखला जाच्या सेटवर अंकिताला प्रपोझ केला होता. २०१३ ला जेव्हा सुशांतचा पहिला चित्रपट काय पो छेच्या प्रीमियरवेळी अंकिता लोखंडे सुशांतसोबत होती. सुशांतच्या निधनानंतरही ती त्याच्या कुटुंबासोबत उभी राहिली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande still remembers Sushant Singh Rajput, says - 'Even today there is a thorn in the flesh ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.