अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल क्रेजी, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2019 04:08 PM2019-11-10T16:08:06+5:302019-11-10T16:08:45+5:30

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. चर्चेत कसे राहायचे हे अंकिताला चांगलेच कळतेय.

ankita lokhande shares latest pictures on instagram | अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल क्रेजी, पाहा फोटो

अंकिता लोखंडेचा ग्लॅमरस अवतार पाहून व्हाल क्रेजी, पाहा फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या अंकिता तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे.

‘मणिकर्णिका’नंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने अद्याप कुठलाही चित्रपट साईन केलेला नाही. पण म्हणून अंकिताची चर्चा कमी नाही. चर्चेत कसे राहायचे हे अंकिताला चांगलेच कळतेय. सोशल मीडियावर स्वत:चे नवे फोटो शेअर करून ती सतत चर्चेत असते. काही तासांपूर्वी अंकिताने असेच स्वत:चे काही नवे फोटो पोस्ट केलेत. या फोटोत अंकिता ग्लॅमरस अंदाजात दिसतेय.


बोल्ड आऊटफिटसोबत अंकिताने ग्लॅमरस मेकअप केले आहे. डोळ्यांच्या पापण्यांना तिने आॅरेंज कलर दिला आहे. सध्या अंकिताच्या या वेगळ्या लूकचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. चाहते या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.


लवकरच अंकिता टीव्हीवर पुनरामगन करणार असल्याचे मानले जात आहे. होय, ‘नागीन 4’ या मालिकेसाठी एकता कपूरने अंकिताची निवड केल्याची चर्चा आहे. निया शर्माचे नाव आधीच या मालिकेसाठी फायनल झाले आहे. तर दुस-या ‘नागिन’साठी अंकिताला साईन करण्यात आले आहे. अर्थात अद्याप याबद्दलची अधिकृत घोषणा झालेली नाही.


यापूर्वी अंकिताने एकता कपूरच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत काम केलेय. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. या मालिकेने अंकिताला एक वेगळी ओळख दिली होती. या मालिकेनंतर एकता व अंकिताने कुठल्याच मालिकेत एकत्र काम केले नाही.  


अलीकडे कंगना राणौतच्या ‘मणिकर्णिका’ या चित्रपटात अंकिताने झलकारीबाईची भूमिका साकारली होती.  सध्या अंकिता तिच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत आहे. अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली. विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.

Web Title: ankita lokhande shares latest pictures on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.