ठळक मुद्देअंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचे नाव अभिनेत्री क्रिती सॅननसोबत जोडले गेले होते. यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात होती.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतला जाऊन आज एक महिना पूर्ण झाला. एक महिन्यापूर्वी आजच्या तारखेला (14 जून) सुशांतने गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला होता. सुशांतच्या अकाली निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. त्याचे चाहते तर अद्यापही या दु:खातून सावरू शकलेले नाही. सुशांतची एक्स- गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे ही सुद्धा   सैरभैर झाली आहे. कोलमडून गेली आहे. गेल्या महिनाभरात सोशल मीडियावर तिने एकही पोस्ट केली नव्हती. पण आज तिने तब्बल महिनाभरानंतर पहिली पोस्ट शेअर केली.

अंकिताने देवासमोर लावलेल्या एका दिव्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने ‘चाईल्ड ऑफ गॉड’ असे कॅप्शन दिले आहे. तिने ही पोस्ट सुशांतसाठी केलीय, हे लगेच लक्षात येते. अंकिताने ही पोस्ट शेअर करताच   तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली.  तो कायम तुझ्याबरोबर आहे, अशा कमेंटही काही युजर्सनी केल्या आहेत.
 सुशांतच्या मृत्यूनंतर तिने त्याच्या कुटुंबीयांची देखील भेट घेतली होती.  

सुशांत आणि अंकिता दीर्घ काळासाठी रिलेशनशीपमध्ये होते. त्यांच्या ब्रेकअपमुळे अनेकांना धक्का बसला होता. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेदरम्यान सुशांत व अंकिता एकमेकांच्या प्रेमात पडले होते.  जवळपास सहा वर्षे ते एकत्र होते. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.

अंकिताशी ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतचे नाव अभिनेत्री क्रिती सॅननसोबत जोडले गेले होते. यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती त्याच्या आयुष्यात होती. सुशांत व रिया लवकरच  लग्न करणार होते. पण त्यापूर्वीच सुशांतने आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. त्याने आत्महत्या का केली, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande shares first post after Sushant Singh Rajput's demise and lights a diya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.