बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या  मृत्यूसंदर्भात रोज नवीन नवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतच्या निधनानंतर एक्स  गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही पुढे येऊन अभिनेत्याच्या मृत्यूवर बोलत आहे. अलीकडेच अंकिता लोखंडेने  तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अंकिताने सुशांतच्या आईचा फोटो हातात घेतला आहे. हा फोटो शेअर करत  ''आशा करते आज तुम्ही दोघेही एकत्र असाल'' असे म्हणत भावूक पोस्ट शेअर केली आहे. 

2002 मध्ये सुशांतसिंग राजपूतची आई उषा सिंग यांचे निधन झाले होते. सतत सुशांत त्याच्या आईविषयी बोलायचा. आईच्या  आठणीने व्याकुळ झालेला  सुशांतला बर्‍याचदा इंस्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करताना आणि तिची आठवण करताना पाहिले गेले होते.

 सुशांत सिंह राजपूतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. तो त्यांच्या अतिशय जवळ होता. इतकेच नाही तर सुशांतच्या नावातच त्याच्या आईचेही नाव दडले होते. त्यामुळे त्याचे आपल्या नावावरही खूप प्रेम होते. याचा खुलासा स्वतः सुशांतने सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना केला होता. त्याचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होतोय.

स्क्रिनशॉटनुसार चाहत्याने सुशांतला त्याच्या नावाचा अर्थ विचारला होता. ज्याचे उत्तर देताना सुशांत म्हणाला होता, "याचा अर्थ काहीही ते सर्वकाही असा होतो. पण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे माझ्या नावाच्या मध्यभागी म्हणजे हृद्यात माझ्या आईचे नाव म्हणजे 'उषा' (s'USHA'nt) आहे. काय अद्भुत गोष्ट आहे ना?', असे सुशांतने सांगितले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande Shared Photo Of Sushant Singh Rajput Mother Usha Singh Writes Emotional Post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.