Is Ankita Lokhande responsible for Sushant's quarrel with Yashraj Films? | सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत खटके उडण्यामागे अंकिता लोखंडे आहे कारणीभूत?, 'सुलतान'मधून करणार होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री

सुशांतचे यशराज फिल्म्ससोबत खटके उडण्यामागे अंकिता लोखंडे आहे कारणीभूत?, 'सुलतान'मधून करणार होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. असेही बोलले जात आहे की सुशांत सिंग राजपूत प्रोफेशनला लाइफमुळे खूप चिंतेत होता. तर असेही बोलले जाते की तो खासगी आयुष्यामुळेही त्रस्त होता. पवित्र रिश्ता मालिकेनंतर सुशांतने काय पोछे सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री मारली होती. त्यानंतर तो यशराज फिल्म्सच्या टॅलेंट एजेंसीशी जोडला गेला होता. यशराज फिल्म्सच्या शुद्ध देसी रोमांस आणि ब्योमकेश बख्शी या चित्रपटात काम केल्यानंतर अचानक सुशांतने यशराज फिल्म्ससोबतच्या तीन चित्रपटांचा करार रद्द केला.

असे सांगितले जात होतो की यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत बनणारा चित्रपट पानीमध्ये सुशांत मुख्य भूमिका साकारणार होता. पण बजेट जास्त असल्यामुळे यशराज फिल्म्सने या सिनेमातून माघार घेतली होती आणि त्यावेळी सुशांत खूप त्रस्त झाला होता. यादरम्यान जेव्हा आदित्य चोप्राने रणवीर सिंगला बेफिक्रे चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुशांतचा राग आणखीन वाढला. यादरम्यान सुशांत व आदित्यमध्ये खूप वाद झाले. खरेतर आदित्य चोप्राने सुशांतला वचन दिले होते की त्याच्या या सिनेमात ते सुशांतला घेणार होते.

सुशांतच्या निधनानंतर ही गोष्ट जगासमोर आली. पण यादरम्यान या प्रकरणात कुठेना कुठे अंकिता लोखंडेचेदेखील नाव जोडले गेले. अंकिता लोखंडेने सलमान खानच्या सुलतान चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते आणि आदित्यसोबत अली अब्बास जफरला अंकिताचे अभिनय कौशल्य भावले होते. पण ऐनवेळी अंकिताला या प्रोजेक्टमधून हटविण्यात आले होते. पण या चित्रपटात अनुष्का शर्माची निवड करण्यात आली होती.

जेव्हा अंकिता लोखंडेला सुलतानमध्ये घेतले नाही त्यामुळे तो खूप त्रस्त झाला होता. अंकिताला त्रस्त झालेले पाहून सुशांतचा पारा आणखीन वाढला होता. या सगळ्या प्रकरणात सुशांतने अखेर यशराज फिल्म्ससोबत आपले नाते तोडले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Is Ankita Lokhande responsible for Sushant's quarrel with Yashraj Films?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.