Ankita lokhande house was filled with her and sushant singh rajput photos this old photo viral on social media | अंकिता लोखंडेने सुशांत आणि तिच्या फोटोंनी सजवले होते आपले घरं, जुना फोटो होतोय पुन्हा व्हायरल

अंकिता लोखंडेने सुशांत आणि तिच्या फोटोंनी सजवले होते आपले घरं, जुना फोटो होतोय पुन्हा व्हायरल

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याच्याशी संबंधित काही जुने व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता चाहत्यांनी अंकिता लोखंडेचा एक जुना फोटो शेअर केला आहे ज्यात ती घरी आईसोबत उभी दिसते आहे. पण फोटोच्या मागच्या भिंतीवर तुम्हाला सगळे फोटो लावलेले दिसतायेत. हे सगळे फोटो अंकिता आणि सुशांतचे आहेत. अंकिता जिथं आपल्या आईसोबत उभी आहे तिथं सुद्धा सुशांत आणि तिचा फोटो दिसतोय. या फोटोवरुन अंदाज लावतो येतो की, जेव्हा अंकिता सुशांतसोबत रिलेशनशीपमध्ये होती तेव्हा तिने आपलं घरं सुशांतसोबतच्या फोटोंनी सजवले होते. 

नुकत्याच एका मुलाखती दरम्यान सुशांतचा मित्र संदीप सिंग म्हणाला होता की,  अंकिता खूप भावूक मुलगी आहे. अंकिता आणि सुशांत सात वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. सुशांतच्या जाण्याचा अंकिताला जबरदस्त धक्का बसला आहे. अंकिता सुशांतची फक्त गर्लफ्रेंड नव्हती ती त्याची आईप्रमाणे काळजी घ्यायची. सुशांतच्या आवडीचे जेवण करायची. अंकिताच्या घरचे इंटिरिअरदेखील सुशांतच्या आवडीचे होते. अंकिता सुशांतला घेऊन खूप इमोशनल होती. सुशांतचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सुशांतसाठी जवळपास तिने अभिनय सोडला होता. टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा असल्याने तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. ब्रेकअपनंतरही सुशांतचा कोणताही सिनेमा  शुक्रवारी रिलीज होताच अंकिता देवाकडे त्याच्या यशासाठी प्रार्थना करायची. 

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita lokhande house was filled with her and sushant singh rajput photos this old photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.