Ankita Lokhande disclosed the ban | अंकिता लोखंडे ने केला हा खुलासा

अंकिता लोखंडे ने केला हा खुलासा

अंकिता लोखंडे लवकरच ‘मणिकर्णिका : द क्वीन आॅफ झांसी’ या चित्रपटातून करतेय. यात ती झलकारी बाईंची भूमिका साकारणार आहे. झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. इंग्रज सेनानी ह्यू रोज याच्या सैन्याने झाशीच्या किल्ल्यावर निकराचा हल्ला केला असता, झलकारीबाईच्या सल्ल्यानुसार राणीने झाशीचा किल्ला रात्रीच्या अंधारात सोडला. यादरम्यान झलकारीबाई यांनी राणीप्रमाणे वेश धारण करून ह्यू रोजच्या सैन्याशी युद्ध केले. पण ते नाटक इंग्रज सैनिकांना समजले. त्यांनी झलकारीबाईला पकडले व फासावर लटकवले होते. यात अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. हीच भूमिका चित्रपटात अंकिता साकारणार आहे. ही भूमिका साकारणे तिच्यासाठी आव्हानात्माक होती. 
  
मुंबई मिररला दिलेल्या इंटव्हु दरम्यान अंकिता म्हणाली, ''प्रत्येक स्त्रीप्रमाणे मी ही धौर्यवान आहे. काही ही करण्यासाठी मी सक्षम आहे. इतरांसाठी मी स्वत:ला बदलणार नाही. कंगना बद्दल बोलताना अंकिता म्हणाली की,  ती खूप गोड आहे आणि सेटवर माझ्यासोबत खूपच प्रेमाने वागायची.'' 

यानंतर पुढे अंकिताने पद्मावतबाबत खुलासा केला. तिला संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपट नाकारण्यामागेच कारण तिने दिले. अंकिताने सांगितले की, मला संजय सर आवडतात. त्यांनी माझा टैलेंटचे कौतुक केले आहे. त्यांनी मला वेळ वाया न घालवण्याचा सल्ला दिला होता मात्र ती संधी मी हुकली आहे.

ALSO READ :  ​असे काय झाले की रस्त्यावर नाचत सुटली अंकिता लोखंडे?

२०१४ मध्ये आलेल्या ‘पवित्र रिश्ता’मधून अंकिता घरात घरात पोहोचली होती. यानंतर तिचे फॅन्स गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या बॉलिवूड डेब्यूची वाट बघत होते. बॉलिवूड डेब्यूला घेऊन अंकिता खूपच उत्साहित आहेत.     

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande disclosed the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.