'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत अंकिता लोखंडेने करोनाची घेतली लस, Video प्रचंड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 03:36 PM2021-05-08T15:36:37+5:302021-05-08T15:37:01+5:30

अंकिता लोखंडेने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे.

Ankita Lokhande Chants Swami Samarath Name While Taking Corona Vaccination | 'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत अंकिता लोखंडेने करोनाची घेतली लस, Video प्रचंड व्हायरल

'बापरे.. स्वामी...स्वामी.. स्वामी' म्हणत अंकिता लोखंडेने करोनाची घेतली लस, Video प्रचंड व्हायरल

Next

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीची अपडेट ती चाहत्यांसह शेअर करत असते. अनेकदा चाहते तिला ट्रोल करत असतात. मात्र या ट्रोलिंगचा अंकितालाही फारस फरक पडत नाही. या ना त्या कारणामुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अंकिता लोखंडे चर्चेत आली आहे. तिच्या एका व्हिडीओने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

 

खुद्द अंकितानेच हा व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. नुसता व्हिडीओच शेअर केला नाही तर इतरांनाही लस घेण्यासाठी आवाहन तिने केले आहे.  कोरोना लस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लस घेताना अंकिता लोखंडे प्रचंड घाबरलेली दिसत आहे. नर्सही तिचे लक्ष दुसरीकडे जावे यासाठी काही सुचना देत असल्याचे पाहायला मिळते. अशात अंकिताने स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायला सुरुवात करते आणि एकदाची लस घेवून मोकळी होते. लस घेतल्यानंतर मात्र अंकिताच्या जीवात जीव आला आणि ती हसायला लागते असे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. 


अंकिताने पहिला डोस घेतानाचा हा व्हिडीओ आहे. लस घेण्यासाठी अंकिताची आई देखील तिच्यासोबत होती.आईनेही अंकितालाही धीर दिला पण तरी इंजेक्शन पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर होताच विविध कमेंट करताना नेटीझन्स दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सध्या तिच्या कामांपेक्षा खासगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत असते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या रिलेशनशीपला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. ते दोघे लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत सुशांत सिंग राजपूत तिच्यासोबत मुख्य भूमिकेत होता. या मालिकेशिवाय अंकिता 'मणिकर्णिका' आणि 'बागी ३' मध्ये पहायला मिळाली होती.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita Lokhande Chants Swami Samarath Name While Taking Corona Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app