Ankita lokhande boyfriend vicky jain appeal to join global prayer meet of sushant singh rajput | सुशांतच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैनने केली ही पहिली पोस्ट

सुशांतच्या मृत्यूनंतर 2 महिन्यांनी अंकिताचा बॉयफ्रेंड विकी जैनने केली ही पहिली पोस्ट

सुशांत सिंग राजपूत मृत्यू होऊन आज दोन महिने पूर्ण झाले. सुशांतची बहीण श्वेता सिंग किर्तीने 15 ऑगस्टला सुशांतसाठी एक ग्लोबल प्रेयर मीट ठेवली आहे. अंकिता लोखंडेचा बॉयफ्रेंड विकी जैन याचा एक भाग बनला आहे. विकीने लिहिले, ''आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुशांत सिंग राजपूतच्या प्रर्थना सभेला उपस्थित रहावे.'' याचसोबत विकीने  #cbiForssR आणि #JusticeForSushantSinghRaiput या हॅगटॅगचा देखील उपयोग केला आहे. विकीच्या या पोस्टवर अंकिता लोखंडेने देखील कमेंट केली आहे. 

या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी सुशांतच्या कुटुंबीयांची इच्छा आहे. सुशांतच्या चाहत्यांकडून देखील वारंवार सीबीआय चौकशीची मागणी केली जात आहे. श्वेता सिंग किर्ती म्हणाली, मी तुम्हाला एक विनंती करते की पुन्हा एकदा एकत्र या आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायचे आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा हक्क आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही. 15 ऑगस्टला श्वेता सिंगने सुशांतसाठी एक ग्लोबर प्रेयर मीट आयोजन केले आहे. 


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ankita lokhande boyfriend vicky jain appeal to join global prayer meet of sushant singh rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.