अभिनेत्री अंकिता लोखंडे विकी जैनसोबत असलेल्या अफेयरमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.  याव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोशूटमुळे देखील चर्चेत येत असते. आता नुकतेच तिने फोटोशूट केले असून ते फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप स्टनिंग दिसते आहे.


अंकिता लोखंडे हिने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने हे गेटअप म्युझिक मिर्ची अवॉर्डसाठी केला होता. यावेळी तिने ब्लॅक रंगाचा शॉर्ट वनपीस परिधान केला असून त्यावर तिने हाय पोनी हेअरस्टाईल केली आहे. मात्र त्यासोबतच तिने केलेली हेअरस्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या फोटोत ती खूपच झक्कास दिसते आहे. 


अंकिता लोखंडे हिने छोट्या पडद्यावरून कारकीर्दीला सुरूवात केली आहे. तिने पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनय क्षेत्रात तिने एन्ट्री केली. या मालिकेतून ती खूप लोकप्रिय झाली होती.

त्यानंतर गेल्या वर्षी तिने कंगना रानौतची मुख्य भूमिका असलेला चित्रपट मणिकर्णिका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अंकिताने झलकारी बाईची भूमिका साकारली होती. या भूमिकेचं सगळीकडून खूप कौतूक झाले होते.

आता ती बागी 3 चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय ती चेहरे या चित्रपटातही दिसणार असल्याचे बोलले जात आहे. 

Web Title: Ankita Lokhande in black dress looks very stunning, comments on photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.