Anil kapoor childhood picture shared by brother boney kapoor | लहानपणापासूनच स्टायलिश आहेत अनिल कपूर, भाऊ बोनी कपूरने शेअर केला फोटो

लहानपणापासूनच स्टायलिश आहेत अनिल कपूर, भाऊ बोनी कपूरने शेअर केला फोटो

बॉलिवूड निर्माता बोनी कपूर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.  त्यानी लहानपणीचा सेलिब्रेशन करतानाचा कुटुंबाचा फोटो शेअर केले. या फोटोत त्यांचा भाऊ अनिल कपूर आणि सुनील कपूर देखील दिसतायेत. 

बोनी कपूर यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक जुना फोटो शेअर केले आहे. यात सगळेजण जेवताना बसलेले दिसतायेत. 'माझा चुलतभाऊ टोनी कपूरचा (सुनील कपूर) वाढदिवस साजरा करत आहोत. मी टोनीच्या पुढे बसून जेवतोय आणि अनिल कपूर कॅमेर्‍यासमोर पोज देतोय.

बोनी कपूर यांचे आगामी सिनेमा
बोनी कपूर 'मैदान' चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अमित रविंद्रनाथ शर्मा दिग्दर्शित या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. पुढील वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या चित्रपटाशिवाय ते मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक 'हेलेन' तयार करत आहे. या चित्रपटात बोनी कपूर यांची मुलगी जाह्नवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ते  'जुग जुग जियो' सिनेमाच्या शूटिंगसाठी चंदीगढला आहेत. या सिनेमात अनिल कपूर चित्रपट निर्माता करण जोहरच्या ‘तख्त’ चित्रपटात दिसणार आहेत. राज मेहता दिग्दर्शित ‘जुग जुग जिओ’ हा चित्रपट एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे.आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच अनिल कपूर आणि नीतू कपूर यांची जोडी रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे चित्रपटात कियारा आणि वरुण धवन यांच्याही भूमिका आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Anil kapoor childhood picture shared by brother boney kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.