मुंबईतील ९०च्या दशकातील गँगस्टर्सवर आधारीत मुम भाई या आगामी शोचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा शो ६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये भास्कर शेट्टी असलेला अंगद बेदी, रामा शेट्टी असलेला सिकंदर खेर आणि वैष्णवीच्या रूपातील संदीपा धर सज्ज झाले आहेत.

मुम भाईच्या ट्रेलरमध्ये मुंबई हे शहर कशा प्रकारे गुन्हेगार आणि गँगस्टर्स यांच्यामुळे त्रासले होते हे दाखवतो. या स्वप्नांच्या शहरात उगवणाऱ्या भीतीच्या वातावरणापासून शहराला वाचवणे अत्यंत आवश्यक होते. त्यानंतर ही कथा दोन बालपणीच्या मित्रांचे आयुष्य दाखवते. भास्कर आणि रामा शेट्टी कायद्याच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना उभे राहतात. भास्कर हा पोलिस प्रशिक्षण घेऊन मुंबईचा टॉप एन्काऊंटर स्पेशालिस्ट होतो. त्यावेळी आपला जवळच्या आणि आता अंडरवर्ल्ड डॉन झालेल्या आपल्या मित्राविरोधात कारवाई करताना त्याला खूप त्रास होतो. दोघेही शहरावर राज्य करण्यासाठी प्रयत्नशील असताना हा शो प्रेक्षकांना अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत पडद्यावर खिळवून ठेवण्याची खात्री देतो. बंधुत्वाने बांधलेले हे दोघे पाहताना आपल्याला कळेल की, चांगला माणूस वाईट होतो की वाईट माणूस चांगला होतो. आपल्यासमोर खूप प्रश्न निश्चितच आहेत. शूटआऊट अ‍ॅट लोखंडवाला आणि वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईच्या निर्मात्यांनी बनवलेला हा शो तुरूंग, सत्ता, पैसा, राजकारण, एन्काऊंटर्स, मुंबई आणि दुबई यांच्या सर्व घटकांना अभूतपूर्व पद्धतीने स्पर्श करतो आणि आपल्याला आणखी बघायला मिळावे असे वाटत राहते.


या ट्रेलरबद्दल बोलताना अभिनेता अंगद बेदी म्हणाला की, “मला कायमच एन्काऊंटर स्पेशालिस्ट, गँगस्टर्स आणि अंडरवर्ल्डच्या कथांचे आकर्षण वाटत राहिले आहे. मी लहान असतानाही मला अ‍ॅक्शन चित्रपट पाहायला खूप आवडत होते व त्यामागील नाट्य पाहायला आवडायचे आणि मी ‘मुम भाई’ची कथा ऐकली. त्यात भास्कर शेट्टी या एन्काऊंटर स्पेशालिस्टने कशा प्रकारे सुरूवात केली, तो कसा घडला हे ऐकल्यावर हा प्रवास मला रोमांचक वाटला. मी हे आधी कधीच केले नव्हते आणि अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा इतक्या मोठ्या प्रमाणावर लिहिल्या जात नाहीत. ही एक खूप खास व्यक्तिरेखा आहे आणि त्याची वाढ दाखवण्याचा प्रयत्न मला ख-या अर्थाने आकर्षित करून गेला. ‘मुम भाई’ची संपूर्ण टीम हा शो ओटीटीवरील सर्वांत मोठा बनवण्यासाठी सज्ज आहे आणि मला खात्री आहे की, एकता कपूरने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.”


सिकंदर खेर म्हणाला की, “ही बालाजीची खास फिल्म आहे. हा ट्रेलर खूप कडक आहे! अक्षयने आधीच छान असलेली पटकथा आणखी सुंदर बनवली आहे. या शोची एक खासियत म्हणजे ती अत्यंत वेगवान आहे आणि यातील व्यक्तिरेखा एका क्षणात पलटताना दिसतात हे खूपच आश्चर्यकारक आहे. एक कलाकार म्हणून अंगदसोबत काम करताना मला खूप मजा आली. ते अत्यंत चांगले आहेत आणि पडद्यावर प्रत्येक वेळी मदत करतात. आम्ही कलाकार एकमेकांना खूप सहकार्य करतो. १९८० आणि ९०च्या दशकात आयुष्य खूप वेगळे होते आणि हा शो तुम्हाला त्या जगाची एक झलक दाखवतो.”


येत्या ६ नोव्हेंबर पासून ऑल्टबालाजी आणि झी 5 क्लबवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज असलेला ‘मुम भाई’ हा एक क्राइम ड्रामा आहे, जो मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये तुम्हाला घेऊन जातो. ही कथा एक पोलिस आणि गुन्हेगारातील मैत्री दाखवते, जी १९८० च्या नंतरच्या कालावधी पासून २००० च्या सुरूवातीचा काळ दाखवणारी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Angad Bedi and Sikandar Kher's 'Mum Bhai' will be released soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.