And the director got angry with the actress's hand! Bobby Deol said 20 years ago! | ​अन् दिग्दर्शकाने संतापून घेतला ‘या’ अभिनेत्रीच्या हाताला चावा! बॉबी देओलने सांगितलेला २० वर्षांपूर्वीचा किस्सा!

​अन् दिग्दर्शकाने संतापून घेतला ‘या’ अभिनेत्रीच्या हाताला चावा! बॉबी देओलने सांगितलेला २० वर्षांपूर्वीचा किस्सा!

‘पोस्टर ब्यॉयज’द्वारे बॉलिवूडमध्ये कमबॅक केल्यानंतर आता अभिनेता बॉबी देओलजवळ चित्रपटांची रांग लागलीय. होय, येत्या काळात सलमान खान, अक्षय कुमार अशा बड्या स्टार्ससोबत बॉबी काम करताना  दिसणार आहे. ‘रेस3’, ‘हाऊसफुल4’, ‘यमला पगला दिवाना फिर से’ असे अनेक चित्रपट बॉबीच्या झोळीत आहेत. साहजिकचं या निमित्ताने इंडस्ट्रीतील बॉबीचा वावरही वाढला आहे. मीडियातही तो झकळू लागला आहे. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत बॉबीने अनेक जुन्या आठवणी जाग्या केल्या. ‘करीब’ या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्साही त्याने ऐकवला. हा किस्सा चांगलाच रंजक असल्याने तो तुमच्यासोबत शेअर करण्याचा मोह आम्हालाही आवरता येईनासा झालाय.‘करीब’मध्ये बॉबी व अभिनेत्री नेहा लीड रोलमध्ये होते. बॉबीचा हा तिसरा चित्रपट होता तर नेहाचा पहिला. बॉबीने सांगितले की, नेहा इंडस्ट्रीमध्ये एकदम नवखी होती. त्यामुळे ती प्रचंड नव्हर्स होती. शूटींगदरम्यान एका सीनमध्ये नेहाला पहाडावरून खाली येत स्वत:चा उजवा हात मला द्यायचा होता. पण नेहा प्रचंड कंफ्युज होती. ती वारंवार उजव्याऐवजी स्वत:चा डावा हात मला देत होती. खूप सारे टेक्स् झालेत आणि विधू विनोद चोप्रा संतापलेत. तू तुझ्या उजव्या हाताला चावा घे, म्हणजे किमान तो हात पुढे करायचा, हे तुझ्या लक्षात राहिल, असे विधू तिला म्हणाले. तिनेही तेच केले. शॉट रेडी झाला. पण नेहाने पुन्हा तीच चूक केली. आता मात्र विधू विनोद चोप्रा जाम संतापले आणि त्यांनी संतापून स्वत:च नेहाच्या उजव्या हाताला चावा घेतला. ते पाहून सगळे अवाक् झालेत. नेहा तर भीतीने कापू लागली. सीन रेडी झाला आणि पण नेहाने तीच चूक पुन्हा केली...तिने पुन्हा तिचा डावा हातचं माझ्यापुढे केला.’
नेहाचे खरे नाव शबाना रजा आहे. ‘करीब’ हा नेहाचा पहिला चित्रपट. यानंतर ‘होगी प्यार की जीत’,‘फिजा’,‘राहुल’,‘आत्मा’ अशा चित्रपटात ती दिसली. पण तिला जम बसवता आला नाही. एप्रिल २००६ मध्ये तिने अभिनेता मनोज वाजपेयीसोबत लग्न केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: And the director got angry with the actress's hand! Bobby Deol said 20 years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.