चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या पांडेची सध्या ''आज मै उपर आसमाँ निचे'' अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनन्‍या  आगामी सिनेमा 'पति पत्‍नी और वो' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनन्याच्या मेकअपचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत ती मेकअप करत असतानाच जेवत असल्याचे पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे तिचा फाटलेला ड्रेस डिझायनर शिवत असल्याचे पाहायला मिळत आहे. गोल्डन रंगाचा डिझायनर ड्रेस तिने परिधान केलाय. या ड्रेसमध्ये तिचा लूक एखादी अप्सराप्रमाणेच भासत होता. 

एकीकडे तिच्या लूक्सची वाहवा होत असताना दुसरीकडे अनन्यावर नेटीझन्सने निशाणा साधला. याच व्हिडीओमुळे आता अनन्या ट्रोल होत आहे.खुद्द अनन्याचे हा व्हिडीओ शेअर केला होता.  मात्र  ब-याचदा सेलिब्रेटींवर डिझायनर ड्रेसेमुळे अवघडल्यासारखी परिस्थिती येते.तसे अनन्याबरोबर होऊ नये म्हणून डिझायनरने घेतलेली ही खबरदारीचेही एकीकडे कौतुक होत आहे. 

१९७८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पती पत्नी और वो’ या सिनेमात संजीव कुमार, विद्या सिन्हा आणि रंजीता कौर यांनी काम केले होते. राज चोप्रा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. ७० दशकातील हा चित्रपट विवाहबाह्य संबंधांवर आधारित असलेल्या या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. रोमान्स आणि कॉमेडीने सजलेल्या या सिनेमाचा रिमेक याच नावाने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

 


पती पत्नी और वो' सिनेमात तो लखनऊच्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. 'चिंटू त्यागी' असे त्याचे नाव असणार आहे. कार्तिकचा हा अनोखा अंदाज रुपेरी पडद्यावर पाहणे रंजक ठरणार आहे. आता हा ६ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Ananya Pandey shared her own video, a troll on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.